Home /News /crime /

धक्कादायक! जीवापेक्षा ब्लाऊज ठरला महत्त्वाचा; स्वत:ला खोलीत कोंडून घेत महिलेची आत्महत्या

धक्कादायक! जीवापेक्षा ब्लाऊज ठरला महत्त्वाचा; स्वत:ला खोलीत कोंडून घेत महिलेची आत्महत्या

श्रीनिवासने आपली पत्नी विजयलक्ष्मी हिच्यासाठी एक ब्लाऊज शिवला होता. मात्र विजयलक्ष्मीला हा ब्लाऊज आवडला नाही.

    हैदराबाद 06 डिसेंबर : आत्महत्येचं एक धक्कादायख प्रकरण हैदराबादमधून समोर आलं आहे. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना हैदराबादच्या अंबरपेट परिसरातील गोलनाका थिरूमाला नगर येथील आहे. यात 35 वर्षीय विजयलक्ष्मी आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळली. महिलेनं आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे (Woman Commits Suicide after Small Dispute). ब्लाऊजची शिलाई बिघडल्याने महिलेनं आपला जीव दिला असल्याचं सांगितलं जात आहे (Suicide for Blouse). मृत महिलेचा पती श्रीनिवास शिंपी होता. तो कपडे शिवतो आणि ब्लाऊज विकून पैसे कमवतो. त्याने आपली पत्नी विजयलक्ष्मी हिच्यासाठी एक ब्लाऊज शिवला होता. मात्र विजयलक्ष्मीला हा ब्लाऊज आवडला नाही. तिची अशी इच्छा होती की पतीने पुन्हा ब्लाऊज शिवावा. मात्र वेळ नसल्याने श्रीनिवासने पुन्हा ब्लाऊज शिवण्यास नकार दिला. याच कारणामुळे नाराज होत विजयलक्ष्मीने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजयलक्ष्मी हैदराबादच्या अंबरपेट परिसरातील गोलनाका थिरुमाला नगर येथे राहात होती. तिला दोन मुलंही आहेत. श्रीनिवास घरोघरी जाऊन ब्लाऊज आणि कपडे शिवण्याचे काम करतो. यावरच त्याचा कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होतो. त्याने विजयलक्ष्मीसाठी एक ब्लाऊज शिवला होता मात्र तो तिला आवडला नव्हता. विजयलक्ष्मीची अशी इच्छा होती की श्रीनिवासने हा ब्लाऊज उसवून पुन्हा शिवावा. मात्र पतीने असं करण्यास नकार दिला. यामुळे नाराज पत्नीने स्वतःला एका खोलीत बंद केलं. मुलं जेव्हा शाळेतून घरी आली तेव्हा दरवाजा बंद होता. त्यांनी बराच वेळा आवाज दिला मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नाही. ही माहिती श्रीनिवासला दिली गेली तेव्हा समजलं की दरवाजा आतून बंद आहे. बराच वेळ आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने त्याने दरवाजा तोडला. मुलं आणि श्रीनिवास खोलीत गेले तेव्हा विजयलक्ष्मी मृतावस्थेत आढळली. स्थानिक लोकांनी लगेचच घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Suicide news

    पुढील बातम्या