Home /News /crime /

वडिलांच्या गर्लफ्रेडनं गाठला क्रूरतेचा कळस; अल्पवयीन मुलाच्या हातपायाला अन् गुप्तांगाला दिले चटके

वडिलांच्या गर्लफ्रेडनं गाठला क्रूरतेचा कळस; अल्पवयीन मुलाच्या हातपायाला अन् गुप्तांगाला दिले चटके

सेत्तू शेजारीच राहणाऱ्या वेनी नावाच्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये राहू लागला. वेनी सेत्तूच्या मुलांना मारहाण करत असे.

    नवी दिल्ली 01 ऑगस्ट : सावत्र आईनं मुलांसोबत अमानुष कृत्य केल्याची अनेक प्रकरण आपण आजवर ऐकली असतील. मात्र, आज एक अशी घटना समोर आली आहे, ज्यात वडिलांच्या गर्लफ्रेंडनं अल्पवयीन मुलाचा छळ केला आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना तमिळनाडूच्या (Tamil Nadu) वेल्लोर येथील आहे. यात एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या आठ वर्षाच्या मुलासोबत अमानुष कृत्य केलं. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या हात-पाय, पाठ आणि प्रायव्हेट पार्टवर चटके दिल्याचे निशाण दिसून आले (Woman Burnt Hands, Legs and Private Part of Boyfriend's Son) आहेत. मुंबई: डोक्यावर कुटुंबाचं ओझं अन् मनात नैराश्य;20वर्षीय हतबल तरुणीनं संपवलं जीवन समोर आलेल्या वृत्तानुसार, 35 वर्षाच्या सेत्तूचं लग्न ईश्वरी नावाच्या महिलेसोबत झालं होतं. त्यांना दोन मुलंही आहेत. एकाचं वय 10 वर्ष तर दुसऱ्याच 8 वर्ष आहे. चार महिन्यांआधी ईश्वरीनं आत्महत्या केली. यानंतर सेत्तू शेजारीच राहणाऱ्या वेनी नावाच्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये राहू लागला. वेनी सेत्तूच्या मुलांना मारहाण करत असे. 22 वर्षाच्या तरुणीचं 41 वर्षीय व्यक्तीवर जडलं प्रेम; शेवट झाला अतिशय भयानक मंगळवारी हा आठ वर्षांचा मुलगा तिथून पळ काढत आपल्या मावशीच्या घरी पोहोचला. मुलाला अचानक घरी पाहून त्याची मावशी विचारात पडली. मात्र, जेव्हा मुलाच्या पाठीवर आणि प्रायव्हेट पार्टजवळ जळाल्याचे निशाण पाहिले तेव्हा ती आणखीच हैराण झाली. ही महिला मुलांना घेऊन गुडियाथम पोलीस ठाण्यात पोहोचली आणि प्रकरणाची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे बनवणं गरजेचं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Viral news

    पुढील बातम्या