मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

संतापजनक ! तीन मुलींना जन्म दिला म्हणून सासरचे माणुसकी विसरले, प्रचंड अमानुष कृत्य

संतापजनक ! तीन मुलींना जन्म दिला म्हणून सासरचे माणुसकी विसरले, प्रचंड अमानुष कृत्य

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले

शिवानीने तिसऱ्या मुलीला जन्म दिल्यानंतर तिच्या सासरच्यांकडून वारंवार तिला त्रास दिला जात होता. सासरच्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु केला. त्यानंतर आरोपी पतीने शिवानीच्या वडिलांकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती.

  • Published by:  Chetan Patil

पाटणा, 16 नोव्हेंबर : सरकारकडून स्त्री-पुरुष समानतेच्या (Gender Equality) पार्श्वभूमीवर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमधून लैंगिक समानतेविषयी जनजागृती केली जाते. पण तरीदेखील देशाच्या कानाकोपऱ्यात हे असे कार्यक्रम खरंच पोहोचलेले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे बिहारच्या (Bihar) बांका येथे घडलेली धक्कादायक घटना. बांकामध्ये एका महिलेने तिसऱ्यांदा स्त्री अर्भकाला जन्म दिला म्हणून तिच्या पती आणि सासरच्यांनी तिची अमानुषपणे मारहाण करत हत्या (Murder) केली. या घटनेमुळे संपूर्ण बिहार हादरलं आहे. एकीकडे 'मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' सारख्या घोषणा आणि दुसरीकडे ही अशाप्रकारची घटना, त्यामुळे या विषयाला गांभीर्याने घेण्याची जास्त आवश्यकता आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

दहा वर्षांपूर्वी लग्न

संबंधित घटनेतील मृतक महिलेचं शिवानी नाव आहे. तर तिची हत्या करणाऱ्या आरोपी पतीचं सुनील दास असं नाव आहे. या दोघांचं दहा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतरचे काही दिवस ठीक-ठाक होते. पण शिवानीने एकापाठोपाठ तीन मुलींना जन्म दिल्याने तिच्या सासरच्यांनी तिचा छळ सुरु केला होता. त्यांना वंशाचा दिवा होता.

हेही वाचा : मेव्हणीवर जीव जडला, प्रेमाखातर पत्नीचा काटा काढला

तिसऱ्या मुलीला जन्म दिल्यानंतर सासरच्यांकडून छळ

शिवानीने तिसऱ्या मुलीला जन्म दिल्यानंतर तिच्या सासरच्यांकडून वारंवार तिला त्रास दिला जात होता. सासरच्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु केला. त्यानंतर आरोपी पतीने शिवानीच्या वडिलांकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. ते दोन लाख रुपये दिले नाही, तर तुमच्या लेकीला वागवणार नाही, असं आरोपी सुनील आपल्या सासऱ्याला म्हणजेच शिवानीचे वडील सुनील दास यांना म्हणाला.

हेही वाचा : क्षुल्लक कारणावरुन टोकाचा वाद, राजधानी दिल्लीत भयानक रक्तपात; एकाचा मृत्यू

सुनील दास यांची गरिबीची परिस्थिती असल्याने ते पैसे देऊ शकत नव्हते. त्यांनी आपल्या जावायाला समजवण्याचा प्रयत्न केला. पण जावाई आणि मुलीचे सासरचे ऐकून घेण्याच्या मनस्थित नव्हते. अखेर सुनील यांनी पंचायत भरवत आपली व्यथा मांडली होती. तरीही शिवानीच्या सासरच्यांना उपरती झाली नाही.

आरोपींनी महिलेला अमानुषपणे मारलं, पोलिसांकडून पतीला बेड्या

शिवानीच्या माहेरच्यांनी पैसे दिले नाहीत. दुसरीकडे शिवानीने तिसऱ्यांदा देखील मुलीला जन्म दिल्याने तिच्या सासरच्यांनी तिला प्रचंड मारहाण केली. तिच्या पतीने तिच्या डोक्यावर वार केले. अखेर या मारहाणीत शिवानी जखमी झाली. आणि त्यातच तिचा मृ्त्यू झाला. शिवानीच्या मृत्यूची बातमी सजल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Murder