Home /News /crime /

फोन कॉल करुन सेक्ससाठी महिलांची मागणी, शिवसेनेच्या विभागप्रमुखाला महिलेकडून चोप

फोन कॉल करुन सेक्ससाठी महिलांची मागणी, शिवसेनेच्या विभागप्रमुखाला महिलेकडून चोप

फोन कॉल करुन सेक्ससाठी महिलांची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या विभागप्रमुखाला महिलेने चांगलाच चोप दिला आहे.

    विरार, 28 जानेवारी : फोन कॉल करुन सेक्ससाठी महिलांची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या (shiv sena) विभागप्रमुखाला महिलेने चांगलाच चोप (woman beat) दिला आहे. महिलेने चोप दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) चांगलाच व्हायरल होतोय. याप्रकरणी विरार पोलिसांनी (Virar Police) महिलेच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा (molestation) दाखल केला आहे. विरार पूर्वेकडील साईनाथनगर येथील शिवसेनेचा विभाग प्रमुख जितू खाडे (Jitu Khade) असं या पदाधिकाऱ्याच नाव आहे. तर पीडीत महिला ही विरारलाच (Virar) राहते. जितू हा तिला फोन करुन, आयटम आहे का? अशी विचारणा करुन त्रास देत होता. शेवटी महिलेने त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला रिक्षामध्ये बसलेला असताना, चपलाने मारहाण केली. (मुंबईकरांना मोठा दिलासा! धारावीत कोरोनाचा दिवसभरात एकही नवा रुग्ण नाही) महिलेने जितू खाडे विरोधात विरार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हाही दाखल केला आहे. सध्या जितू खाडे फरार आहे. शिवसेनचे पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे (Dilip Pimple) यांनी जितू खाडेच्या कृतीला आमचा पाठिंबा नसून, वरिष्ठांशी बोलून, त्याच्यावर लगेच कारवाई केली जाणार, असं सांगितलं आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या