मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बहिणीच्या नवऱ्यावर जडलं तरुणीचं प्रेम पण...; अतिशय वेदनादायी झाला दाजी-मेहुणीच्या लव्ह स्टोरीचा शेवट

बहिणीच्या नवऱ्यावर जडलं तरुणीचं प्रेम पण...; अतिशय वेदनादायी झाला दाजी-मेहुणीच्या लव्ह स्टोरीचा शेवट

(File Photo)

(File Photo)

चौकशीत असं समोर आलं आहे, की दोघांनीही सोबत विष प्राशन केलं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले

  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 04 सप्टेंबर : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेली (Bareilly) जिल्ह्यातून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. यात एक मेहुणी आणि दाजी रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा जीव वाचला (Couple Commits Suicide) नाही. चौकशीत असं समोर आलं आहे, की दोघांनीही सोबत विष प्राशन केलं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

VIDEO : स्टेजवरच नवरदेवासोबत भांडण करून उठून गेली नवरी, पाहा नेमकं काय झालं

रुग्णालयात दाखल करुनही उपयोग झाला नाही आणि दोघांचाही मृत्यू झाला. यातील युवकाचं वय सुमारे 26 वर्ष तर तरुणीचं वय 22 वर्ष होतं. पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, की मृत व्यक्ती जवळच्याच पीलीभीत जिल्ह्यातील रहिवासी होता. तर, त्याच्यासोबत आढळलेली महिला ही त्याच्या पत्नीची लहान बहीण होती. तपासात असं समोर आलं, की या युवकाचे आपल्या मेहुणीसोबत प्रेमसंबंध (Love Relationship of a Woman With Brother In Law) होते. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होतं, मात्र कुटुंबीय या नात्याला परवानगी देत नव्हते.

पत्नी गरोदर राहिल्यानं कंडोम कंपनीकडे केली तक्रार; अधिकाऱ्यांनी ठेवली विचित्र अट

कुटुंबीयांकडून होणार विरोध पाहता मेहुणीनं आपल्या दाजीसोबत घरातून पळ काढला आणि नंतर दोघांनीही विष प्राशन केलं. अॅडिशनल एसपी राजकुमार अग्रवाल यांनी सांगितलं, की डायल 112 ला कॉलवर अशी माहिती मिळाली, की भोजीपुराच्या सेंथल रोड येथे एक दाम्पत्य बेशुद्धावस्थेत पडलेलं आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत या दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. इथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी पुढे सांगितलं, की मेहुणी आणि दाजीच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं गेलं. यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

First published:

Tags: Love story, Suicide