शरीरसंबंधांसाठी पती गर्भवती पत्नीचा करायचा छळ, तिनं रागात उचललं टोकाचं पाऊल

शरीरसंबंधांसाठी पती गर्भवती पत्नीचा करायचा छळ, तिनं रागात उचललं टोकाचं पाऊल

पती-पत्नीचं नातं समंजसपणावर अवलंबून असतं. अनेकदा समंजसपणाअभावी या नात्यात टोकाची हिंसा घडते.

  • Share this:

इरोड, 22 फेब्रुवारी : तामिळनाडू राज्यातील इरोड इथं एक खळबळजनक घटना घडली आहे. शरीरसंबंधासाठी छळ करणाऱ्या पतीचा पत्नीनं खून (wife murdered husband) केला आहे.

पत्नी पाच महिन्यांची गर्भवती (5 months pregnant) होती. पती तिला सतत शरीरसंबंधांसाठी (sex) आग्रह करत होता. यातून पत्नी संतापली आणि तिनं थेट पतीचा खून केला. संतापाच्या भरात तिनं हे कृत्य केलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

पत्नीनं रागाच्या  भरात आपल्याच पतीची हत्या केली. विशेष म्हणजे, हे टोकाचं पाऊल उचलल्यानंतर आरोपी महिला स्वतःच पोलिसांना शरण गेली. आरोपी महिलेनं पोलिसांना सांगितलं, की तिनं आपल्या पतीला जेवणातून कीटकनाशक मिसळून दिलं (added poison in his meals). यातून त्याचा मृत्यू ओढवला.

आरोपी महिलेचं नाव मैथिली आहे. तिचं लग्न मृत नंद कुमार याच्यासोबत केवळ 8 महिन्यांपूर्वी झालं होतं. ही महिला पाच महिन्यांपूर्वी प्रेग्नन्ट झाली होती. नंद कुमार शेती करायचा. हे नंद कुमारचं दुसरं लग्न होतं. मैथिली 5 महिन्यांची गर्भवती असूनही तो सतत तिला शरीरसंबंधांसाठी आग्रह करायचा. तिनं सतत नकार देऊनही तो ऐकायचा नाही.

हेही वाचाही कसली अग्निपरीक्षा! पत्नीला उकळत्या तेलात हात घालून काढायला लावलं नाणं

तो तिचा छळसुद्धा (tortured) करायचा. 28 जानेवारीला महिलेनं पतीला जेवणात विष मिसळून दिलं. 16 दिवस उपचार चालल्यानंतर नंद कुमारचा मृत्यू झाला. अधियूर पोलीस स्टेशनचे इंस्पेक्टर एस. रवी म्हणाले की, नंद कुमार यानं 15 फेब्रुवारीला हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. हॉस्पिटलनं त्यानंतर पोलिसांना कळवलं. शुक्रवारी महिला पोलिसांना शरण आली. तिला आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Published by: News18 Desk
First published: February 23, 2021, 12:01 AM IST

ताज्या बातम्या