नवरा-बायकोच्या नात्याला घट्ट बांधून ठेवते ती विश्वासाची दोरी; मात्र कित्येक वेळा दोन्हीपैकी एक व्यक्ती दुसऱ्याचा विश्वासघात करते आणि ही दोरी तुटून जाते. अमेरिकेत कनेक्टिकट शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीलाही असाच वाईट अनुभव आला. या व्यक्तीची पत्नी त्याच्याशी एकदा नव्हे, तर 20 वर्षं (Woman fooled husband for 20 years) वारंवार खोटं बोलली. याचा परिणाम म्हणून या व्यक्तीचं मानसिक संतुलनच (Woman convinces husband about Alzheimer’s) ढासळलं. या खोटारड्या पत्नीने आपल्या पतीच्या बँक अकाउंटमधून तब्बल 4 कोटी रुपयेही (Woman stole 4 crore from Husband’s account) चोरल्याचं समोर आलं आहे.
डॉना मॅरिनो (Donna Marino) असं या महिलेचं नाव आहे. तिने आपल्या पतीच्या बँक अकाउंटमधून 4 कोटी 44 लाख रुपयांहून अधिक रक्कम टप्प्याटप्प्याने काढून घेतली होती. गेल्या 20 वर्षांपासून ती तसं करत होती. याबाबत पतीने काही विचारल्यास, ती खोटी उत्तरं देऊन त्यालाच बुचकळ्यात (Woman confuses husband about his memory) पाडत असे. असं करत करत शेवटी या पतीलाही आपल्या स्मरणशक्तीवर विश्वास राहिला नाही आणि आपल्याला मानसिक आजार असल्याची त्याची खात्री पटली होती.
महिला आयोगाच्या मेसेजमुळे SEX रॅकेट उघड!स्पा सेंटरने दिली कॉल गर्ल्सची रेट लिस्ट
खरं तर डॉना ही या व्यक्तीची दुसरी पत्नी आहे. आपल्या पतीचे सर्व आर्थिक व्यवहार डॉनाच पाहत होती. याचाच फायदा घेऊन तिने गेल्या 20 वर्षांमध्ये सुमारे सहा लाख डॉलर्स (Woman stole six lakh dollars from Husband) चोरले. विशेष म्हणजे इतक्या वर्षांत एकदाही तिने आपल्या पतीला बँकेत जाऊ दिलं नाही. जेव्हा कधी तो बँकेत जाण्याचा विचार करत असे, तेव्हा डॉना त्याला थांबवत असे. 'तुला अल्झायमर (Alzheimer’s) असल्यामुळे तुझ्या लक्षात नाही; पण मागच्या वेळी तू बँकेत खूप गोंधळ घातला होतास. त्यामुळे उगाच पुन्हा तमाशा नको,' असं म्हणून ती आपल्या पतीला गंडवत असे. तिच्या वारंवार असं सांगण्यामुळे तिच्या पतीलाही वाटू लागलं होतं की त्याला खरंच मानसिक आजार आहे.
असं फुटलं बिंग
या व्यक्तीच्या मुलीने जेव्हा त्याचे बँक रेकॉर्ड्स पाहिले, तेव्हा या सर्व प्रकरणाचा खुलासा झाला. या व्यक्तीला आपल्या अकाउंट आणि क्रेडिट कार्डवरून झालेल्या ट्रान्झॅक्शनची कसलीच माहिती नव्हती. त्यानंतर तपास केला असता डॉनाने सर्व पैसे आपल्या अकाउंटला जमा केल्याचं समोर आलं. सध्या डॉनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला आहे. आपल्या कुटुंबाच्या मदतीसाठी आपण हे करत होतो, असं या महिलेने कबूल केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime