मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पत्नी म्हणते, 'दाढी ठेवलीस तर घटस्फोट'; इमाम पतीनेही दाखवला इंगा

पत्नी म्हणते, 'दाढी ठेवलीस तर घटस्फोट'; इमाम पतीनेही दाखवला इंगा

या घरामध्ये दाढीवरुन दररोज वाद होत होता, इमाम पती हा पत्नीच्या या मागणीमुळे पुरता वैतागला होता.

या घरामध्ये दाढीवरुन दररोज वाद होत होता, इमाम पती हा पत्नीच्या या मागणीमुळे पुरता वैतागला होता.

या घरामध्ये दाढीवरुन दररोज वाद होत होता, इमाम पती हा पत्नीच्या या मागणीमुळे पुरता वैतागला होता.

  • Published by:  Meenal Gangurde

अलीगड, 25 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) अलीगडमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका इमामच्या पत्नीने दाढी ठेवली तर घटस्फोटाची (Divorce) धमकी दिली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकही हैराण झाले आहेत. दाढी ठेवण्यावरुन झालेल्या वादात इमामने शेवटी एसएसपीकडे तक्रार केली आहे. अद्याप या प्रकरणात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. (Wife says Divorce if you keep beard Imam husband file complaint )

तक्रार करण्यासाठी एसएसपीकडे (SSP) पोहचलेल्या इमामने सांगितलं की, माझं लग्न जून 2020 मध्ये झालं होतं. माझ्या पत्नीला माझी दाढी आवडत नाही, ती वारंवार दाढी कापण्यास सांगते. मात्र मी एका धार्मिक ठिकाणी इमाम असल्यानं असं करून शकत नसल्याचं व्यक्तीने सांगितलं. पत्नीच्या या मागणीमुळे इमाम त्रस्त झाले आहेत. पुढे त्यांनी सांगितलं की, लग्नाच्या काही दिवसातच पत्नी दाढी कापण्याबद्दल धमकी देत होती. एकेदिवशी ती म्हणाली की, मी एक मॉडल तरुणी आहे.

हे ही वाचा-भर लग्नातून नवरदेवाला अटक, पोलिसांच्या गाडीमागे धावत राहिली वधू

त्यामुळे तुम्ही दाढी कापून टाका. दाढीवरुन वारंवार दाम्पत्यामध्ये वाद होत होता. पत्नी केवळ पतीसोबतच नाही तर त्याच्या आई-वडिलांशीही यावरुन भांडण करीत होती. शेवटी वैतागलेल्या पतीने एसएसपी ऑफिसमध्ये पत्नीविरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी आपली व्यथा अधिकाऱ्यांसमोर कथन केली. आता न्यायासाठी इमाम कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहे. इमामने पत्नीविरोधात शारिरीक आणि मानसिक छळ केला जात असल्याचाही आरोप केला आहे.

First published:

Tags: Muslim, Uttar pradesh news, Wife and husband