दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या पत्नीला संपवलं, हत्येनंतर डोकं कापून नदी फेकलं

दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या पत्नीला संपवलं, हत्येनंतर डोकं कापून नदी फेकलं

दुसऱं लग्न करण्यासाठी पत्नी घटस्फोट देत नसल्यानं तिला पतीने आई-वडिल आणि भावाच्या मदतीने तिला संपवलं. सौदी अरेबियात बसून त्यानं तिच्या हत्येचा कट रचला.

  • Share this:

बहराईच, 15 मार्च : भारत-नेपाळच्या सीमेवर असलेल्या रुपईडीहा इथं एका महिलेचा डोकं नसलेला मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकऱणाचा पोलिसांनी छडा लावला असून सौदी अरेबियात राहणाऱ्या पतीसह पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच आतापर्यंत तिघांना अटक करण्यातत आली आहे. पोलिस अधीक्षकांनी याबाबतची माहिती दिली.  रुपईडीहा इथं एका महिलेचा मृतदेह 9 मार्चला सापडला होता. तपास केल्यानंतर मृतदेह टकौरी गावातील महिलेचा मृतदेह असल्याचं समोर आलं होतं.

मृत महिलेचा पती रियाज अली तीन वर्षांपासून सौदी अरेबियामध्ये राहत आहे. महिलेचे तिच्या पतीसोबत आणि घरच्यांसोबत वाद होत असल्यानं ती माहेरी राहत होती. रियाजला तलाक घेऊन दुसरं लग्न करायचं होतं पण पत्नी हसरीन त्यासाठी तयार नव्हती. त्यामुळे हसरीनपासून सुटका करून घेण्यासाठी रियाजने आई-वडिलांना हाताशी धरून तिच्या हत्येचा कट सौदीतून रचल्याचं समोर आलं.

हसरीनच्या हत्येसाठी रियाजने भावाला मुंबईतून बहराईचला पाठवलं. त्यानंतर पत्नीला फोन करून भावासोबत सासरी जाण्यासाठी तयार केलं. सासरी जाताना रस्त्यातच सासरा आणि भाच्याने संधी मिळताच अडगोडवा इथं हसरीनचा चाकूने गळा कापला. त्यानंतर ओळख लपण्यासाठी तिचं डोकं शरयू कॅनलमध्ये फेकून दिलं.

हे वाचा : महिलेने प्रियकरालाच बनवलं जावई, मुलीला आई आणि नवऱ्याच्या अफेअरबद्दल समजलं आणि..

याप्रकरणी हसरीनचा पती रियाज, दीर मेराज, सासरा सादिक अली यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करण्यात आली असून हसरीनची सासू आणि सौदी अरबमध्ये असलेला पती फरार असून दोघांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हे वाचा : धक्कादायक! प्रेयसीला खूश करण्यासाठी त्यानं 6 महिन्यांच्या चिमुकलीला जिवंत जाळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: crime
First Published: Mar 15, 2020 02:18 PM IST

ताज्या बातम्या