Home /News /crime /

संसाराचं स्वप्न भंगलं! नवऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन नव विवाहिता फरार...

संसाराचं स्वप्न भंगलं! नवऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन नव विवाहिता फरार...

या सर्व प्रकारामुळे तरुणाला जबर धक्का बसला आहे आणि त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

  जयपूर, 20 जानेवारी : राजस्थानमधील (Rajasthan News) भरतपुरमध्ये लग्नाच्या अडीच महिन्यानंतर पतीला झोपेच्या गोळ्या देऊन नव्या नवरीने (Bride ran Away) पळ काढला. यावेळी ती जाताना घरातील दागिने आणि पैसे घेऊन पसार झाली. तरुणाने 10 लाख रुपये देऊन लग्न केलं होतं. बुधवारी रात्री पत्नीने त्याला झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केलं आणि घरातील सोनं, चांदी, दागिने आणि 30 हजार रुपये घेऊन फरार (Crime News) झाली. प्रकृती बिघडल्यानंतर पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Wife ran away after feeding sleeping pills to her husband took all the jewelery and money kept in the house ) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदरा गावातील 35 वर्षीय भगवान सिंह याचं लग्न ठरत नव्हतं. शेवटी भगवान सिंहचा मामा हीरा गूजर यांनी आपल्या एका नातेवाईकासोबत भाच्याच्या लग्नासाठी बोलणी केली. हीराचा नातेवाईक धौलपुर जिल्ह्याच्या मोहरीच्या पुरा गावातील निलमबद्दल सांगितलं. त्यानंतर निलम आणि भगवान सिंह या दोघांचं लग्न ठरवण्यात आलं. निलमच्या कुटुंबाला यापूर्वी 10 लाख रुपये देण्यात आले होते. ज्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी दोघांचं लग्न पार पडलं. हे ही वाचा-आधी धर्मपरिवर्तन अन् मुलांच्या भविष्याची चिंता;निवृत्त IRS अधिकाऱ्याची आत्महत्या लग्न ठरल्यानंतर भगवान सिंहने आपल्या मामाच्या नातेवाईकांना पैसे दिले. जेव्हा निलम घरातून फरार झाली त्यानंतर भगवान सिंहने त्या नातेवाईकांच्या घरी पोहोचला. मात्र मध्यस्थी करणारी व्यक्तीही फरार असल्याचं समोर आलं. पुढे भगवान सिंहने सांगितलं की, निलमच्या वडिलांची जमिनीच्या वादावरुन हत्या करण्यात आली होती. त्याचा सूड उगवण्यासाठी तिच्या दोन्ही भावांनी मारेकऱ्याची हत्या केली. त्यामुळे निलमचे दोन्ही भाऊ तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

   

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Crime news, Money fraud, Rajasthan

  पुढील बातम्या