Home /News /crime /

वकील पत्नीनंच दिली शिक्षकाला मारण्याची सुपारी, असं काय घडलं की स्वतःच्या पतीची केली हत्या?

वकील पत्नीनंच दिली शिक्षकाला मारण्याची सुपारी, असं काय घडलं की स्वतःच्या पतीची केली हत्या?

बख्तियारजवळ एका शिक्षकाची गोळी झाडून हत्या (Shot Dead) करण्यात आली. पोलीस तपासात समोर आलं, की या शिक्षकाची हत्या त्याच्याच वकील असलेल्या पत्नीनं (Wife Planned Husband's Killing) करून घेतली.

    पटना 28 मार्च : बख्तियारजवळ एका शिक्षकाची गोळी झाडून हत्या (Shot Dead) करण्यात आली. ही घटना घडली त्यावेळी शिक्षक जमीन पाहाण्यासाठी गेला होता, जी त्याला विकत घ्यायची होती. हे प्रकरण नेमकं का घडलं याचा तपास करणं अत्यंत अवघड होतं. त्यामुळे, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चार टीम तयार केल्या आणि तपास सुरू केला. जवळपास आठवडाभर चौकशी आणि तपास केल्यानंतर अखेर या घटनेचं सत्य समोर आलं. पोलिसांनी सांगितलं, की या शिक्षकाची हत्या त्याच्याच वकील असलेल्या पत्नीनं (Wife Planned Husband's Killing) करून घेतली आणि यात तिची साथ दिली तिच्या प्रियकरानं. हा प्रियकरदेखील वकीलच आहे. असा रचला हत्येचा कट - या हत्येमागे दोन वकीलांचा कट होता. एक होती त्याची पत्नी प्रतिमा कुमार आणि दुसरा होता तिचा प्रियकर सुनील कुमार गोस्वामी. दोघांचेही अनेक काळापासून संबंध होते. दोघंही पटनाच्या सिव्हिल कोर्टात वकील होते. त्यामुळे पतीला त्यांच्यावर कधी शंका आली नाही. मात्र, आता शिक्षक पतीला आपल्या रस्त्यातून बाजूला करायचं असं ठरवून दोघांनी हा कट रचला. ठरलेल्या कटानुसार वकील पत्नीनं जमीन विकत घेण्याचा आग्रह केला. यानंतर तिचा पती दुचाकीवर जमीन पाहाण्यासाठी निघाला. पत्नीदेखील आपल्या मुलीसोबत स्कूटीवर त्यांच्या मागे गेली. पत्नीला आधीपासूनच माहिती होतं, की पतीवर केव्हा आणि कुठे हल्ला होणार आहे. त्यामुळे, तिनं आपली गाडी मुद्दाम हळू चालवण्यास सुरुवात केली. शिक्षकाची गाडी छपाक वॉटर पार्कजवळ पोहोचताच आरोपींनी त्याला घेरुन गोळीबार केला. काही वेळात महिला आणि तिची मुलगी याठिकाणी पोहोचली आणि रडायला सुरुवात केली. पत्नीनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत म्हटलं, की आरोपींनी तिच्या पतीची हत्या करत चार लाख रुपये चोरी केले. ही रक्कम त्यांना जमीन मालकाला द्यायची होती. पोलिसांनी सांगितलं, की वकील जोडप्यानं ही हत्या करण्याची सुपारी कॉन्ट्रॅक्ट किलर्सला दिली होती. चार लाखात ही सुपारी दिली गेली होती आणि ५० हजार अॅडव्हान्सही दिले गेले होते. पोलिसांनी जेव्हा घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा तिथे वकील प्रियकरही दिसला. नंतर असं समोर आलं, की तो अनेकदा शिक्षकाच्या घरी यायचा. पोलिसांनी जेव्हा अधिक तपास केला तेव्हा ही संपूर्ण घटना समोर आली. यानंतर पोलिसांनी कॉन्ट्रॅक्ट किलर्सला अटक केली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder news, Wife, Women extramarital affair

    पुढील बातम्या