Home /News /crime /

बायकोला सोडायचं नव्हतं पण प्रेयसी हवी, पत्नीनं केला विरोध तर म्हणाल, तलाक-तलाक-तलाक

बायकोला सोडायचं नव्हतं पण प्रेयसी हवी, पत्नीनं केला विरोध तर म्हणाल, तलाक-तलाक-तलाक

पत्नीनं विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी पतीला विरोध केला आणि पतीचा संताप अनावर झाला आणि त्यातून खूप मोठं संकट ओढवलं.

    बुलढाणा, 11 डिसेंबर : विवाहबाह्य संबंध उघडकीस आल्यानंतर लग्न मोडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असाच एका धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे. पत्नीनं विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी पतीला विरोध केला आणि पतीचा संताप अनावर झाला आणि त्यातून खूप मोठं संकट ओढवलं. संतापलेल्या पतीनं टोकाचं पाऊल उचलत पत्नीला बेदम मारहाण देखील केली. विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी पत्नीनं नकार दिला त्यामुळे पतीचा संताप अनावर झाला. पत्नीलाही सोडायचं नव्हतं आणि विवाहबाह्य संबंध देखील ठेवायचे होते. मात्र पत्नीचा होणारा विरोध पाहून पतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिथे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळी पतीनं पीडितेवर हात उचलत बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार 22 नोव्हेंबरला बुलढाण्यातील चिखली शहरात घडल्याची माहिती मिळाली आहे. हे वाचा-ड्रग्जचा व्यापार करणारी महिला गजाआड; कोटींची बंगला, हिऱ्याचे दागिने असा होता थाट मी एक दोन नाही तर दहा महिलांशी संबंध ठेवेन तुला मी तलाक देत आहे असं म्हणत पतीनं पीडितेला तीन वेळा तलाक...तलाक...तलाक म्हणत घरातून निघून गेला. पत्नीला हे ऐकून धक्का बसला. पीडितेनं दिलेल्या फिर्यादीनुसार तिने अनेकवेळा पतीला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र पतीनं ऐकलं नाही. यावरून दोघांमध्ये खूप वाद झाले. पीडितेनं अखेर न्याय मागण्यासाठी शेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेनं दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात कलम 498, 323 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडितेनं तातडीनं न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या