मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून, रचला आत्महत्येचा बनाव; असा झाला उलगडा

प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून, रचला आत्महत्येचा बनाव; असा झाला उलगडा

आपला पती आपल्या अफेअरमध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीनेच त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आपला पती आपल्या अफेअरमध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीनेच त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आपला पती आपल्या अफेअरमध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीनेच त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

जयपूर, 31 डिसेंबर: आपल्या प्रियकराला (Boyfriend) सोबत घेत पतीचा खून (Murder of husband) करणाऱ्या महिलेला (Woman) पोलिसांनी अटक (Police arrested) केली आहे. आपला पती हा आपल्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या रागातून महिलेनं त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आपल्या प्रियकराची मदत घेत पतीवर खुनी हल्ला केला. त्यात पती ठार झाल्यावर तिने बनाव रचला आणि पतीने आत्महत्या केली, असं दाखवलं. मात्र अखेर तिचं बिंग फुटलंच.

काय आहे प्रकरण?

राजस्थानमधील चुरू भागात राहणाऱ्या सरोज नावाच्या महिलेचं रणजीतसोबत लग्न झालं होतं. दोघांमध्ये सतत भांडणं होत होती आणि सरोज अनेकदा माहेरी निघून जात होती. याच काळात तिचं अफेअर सुरेंद्र जाट नावाच्या तरुणासोबत सुरू झालं. याची रणजीतला कल्पना आल्यावर त्याने याला आक्षेप घेतला आणि दोघांनाही एकमेकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र त्याचा सल्ला फेटाळून लावत सरोजनं हे प्रकरण सुरूच ठेवलं होतं. त्यावरून दोघांमध्ये कडाक्याची भांडणं झाली आणि सरोजनं पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

प्रियकराच्या मदतीने केला खून

घटनेच्या दिवशी सरोजने सुरेंद्रला घरी बोलावलं आणि पतीचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पतीचा मृतदेह फासावर लटकावला आणि सुरेंद्रला घरी जायला सांगितलं. पहाटेच्या सुमाराला आपल्या पतीनं आत्महत्या केल्याचा आरडाओरडा करत तिने शेजारी आणि नातेवाईकांना बोलावून घेतलं.

भावाने केली तक्रार

ही घटना आत्महत्येची आहे, असं प्रथमदर्शनी पोलिसांनाही वाटलं होतं. मात्र रणजीतच्या भावाने सांगितलेल्या काही बाबींनंतर पोलिसांना संशय आला. सरोज ही काही आठवडे घर सोडून निघून गेली होती. बोलावूनही ती येत नव्हती. रणजीतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदरच ती घरी आली होती. त्याचप्रमाणे घटनेच्या अगोदर काही दिवस सुरेंद्र परिसरात दिसला होता आणि घटनेच्या रात्री एक गाडी रणजीतच्या घरापाशी थांबली होती, अशी माहिती रणजीतच्या भावाने दिली.

हे वाचा- नोकरी सोडून फक्त मोबाईलवर असते महिला; सोशल मीडिया करतेय तिच्या 12 मुलांचा सांभाळ

सरोजने दिली कबुली

पोलिसांनी या माहितीच्या आधारे कसून चौकशी केल्यावर सरोजने सुरुवातीला आपण खून केल्याचं सांगत सुरेंद्रला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर दोघांचं पितळ उघडं पडलं आणि पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

First published:

Tags: Crime, Murder, Police, Wife and husband