मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, असं फुटलं पतीचं बिंग

विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, असं फुटलं पतीचं बिंग

विवाहितेची गळा दाबून हत्या (Wife Murder in Banka) करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना बिहारच्या बांका (Banka Bihar) येथे घडली. या घटनेनंतर पतीसह कुटुंबातील इतर सदस्य घर सोडून फरार आहेत.

बांका, 14 मे : विवाहितेची गळा दाबून हत्या (Wife Murder in Banka) करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना बिहारच्या बांका (Banka Bihar) येथे घडली. या घटनेनंतर पतीसह कुटुंबातील इतर सदस्य घर सोडून फरार आहेत. पती लक्ष्मण यादव, त्याचा भाऊ आणि इतर कुटुंबीयांवर या हत्येचा आरोप आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

विवाहित महिला मनीता हिचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह गायब करण्याचा कट होता. मात्र, त्यापूर्वीच मुलासह इतर लोकांना या हत्येची माहिती मिळाली आणि त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी बांका पाठवला.

लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मनिताचे पतीसोबतचे संबंध चांगले नव्हते. त्यामुळे तिचा सतत छळ होत होता. मनीताच्या माहेरच्या लोकांचा आरोप आहे की, तिचा पती लक्ष्मणचे अन्य महिलेसोबत संबंध (Illegal Relationship) होते. याच कारणामुळे तिची हत्या करण्यात आली. मनिताचा मोठा मुलगा लड्डू (10) याने त्याच्या वडिलांवर आईला तसेच भावंडांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या हत्येच्या घटनेबाबत त्याने सांगितले की, प्रथम त्याला घराबाहेर पाठवण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी आईची हत्या केली.

मृतदेहासोबत पोलीस ठाण्यात मनीता हिचे भावोजी तेजनारायण यादव होते. यावेळी त्यांनी सांगितले की, मनीताचा छळ केला जात आहे, असे माझी पत्नी मला नेहमी सांगायची. अनेक वेळा हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, मनीताच पती लक्ष्मण याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याने मनीतासोबत त्याचे संबंध तितके चांगले नव्हते. दोन दिवस आधी सुद्धा मनीताला मारहाण करण्यात आली होती. तसेच आजसुद्धा आधी मारहाण करण्यात आली आणि यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली.

हेही वाचा - विवाहाच्या रिसेप्शन पार्टीत चक्क वधूनेच केला आनंदाच्या भरात गोळीबार

दरम्यान, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास कसुन करत आहेत. पोलीस अधिकारी शंभु यादव यांनी या हत्येला दुजोरा दिला आहे. तसेच या घटनेचा कसून तपास केला जाईल. तसेच दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

First published:

Tags: Bihar, Crime news, Murder news