पत्नीने नवऱ्याला सोडून केला दुसऱ्यासोबत प्रेमविवाह, संतापलेल्या पतीने गाठले घरं आणि...

पत्नीने नवऱ्याला सोडून केला दुसऱ्यासोबत प्रेमविवाह, संतापलेल्या पतीने गाठले घरं आणि...

आपल्या पत्नीने दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमविवाह केल्यामुळे रंगरावला प्रचंड राग होता

  • Share this:

यवतमाळ, 16 ऑगस्ट : पत्नीने नवऱ्याला सोडून दुसऱ्या माणसासोबत लग्न करून सोबत राहू लागल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने तिच्या प्रियकारांचा खून केल्याची खळबजनक घटना यवतमाळ जिल्ह्यातील घडली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगराव श्रावण घोटेकर (वय 34) हा आपल्या पत्नी आणि मुलांसह चाणी परिसरात राहत होता. पण, रंगराव आणि त्याच्या पत्नीत नेहमी वाद होत होते. त्यामुळे पत्नीने रंगरावला सोडून दिले आणि  गणेश शंकर टेकाम (वय 34) याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाह झाल्यानंतर तिने आपल्या मुलांना घेऊन गणेशचे भोयर येथील घर गाठले.

पंतप्रधान मोदी आता ‘क्वारंटाइन’ होणार का? शिवसेना खासदाराचा थेट सवाल

आपल्या पत्नीने दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमविवाह केल्यामुळे रंगरावला प्रचंड राग होता. त्यामुळेच त्याने बुधवारी रात्री भोयर येथे गणेशचे घर गाठले. त्याने आपल्या पत्नी आणि गणेशशी वाद घातला. त्यानंतर घरात घुसून गणेशला बेदम मारहाण सुरू केली. त्याची पत्नी भांडण सोडवण्यासाठी गेली असता तिलाही त्याने ढकलून दिले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

रत्नागिरीच्या समुद्रात थरारक घटना, लाटेपासून वाचण्यासाठी बोट फिरवली, पण...

रंगरावने लाथा-बुक्याने बेदम मारहाण करत गणेशला ठार मारले. गणेश कोणतीही हालचाल करत नसल्यामुळे रंगराव तिथून फरार झाला. या घटनेनंतर पत्नीने यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गणेशचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.

पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी रंगराव घोटेकरला अटक करण्यात आली. या प्रकरणाची अधिक तपास पोलीस करत आहे.

Published by: sachin Salve
First published: August 16, 2020, 11:11 AM IST
Tags:

ताज्या बातम्या