Pune News: भाऊ अन् बायकोच उठले जीवावर, दीर-भावजयीनं दगडानं ठेचून केली हत्या

Pune News: भाऊ अन् बायकोच उठले जीवावर, दीर-भावजयीनं दगडानं ठेचून केली हत्या

Murder in Pune: पुणे जिल्ह्यातील भोर याठिकाणी एका महिलेनं आपल्या दिराच्या मदतीनं आपल्याच पतीची (wife killed husband) दगडानं ठेचून हत्या (murder) केली आहे.

  • Share this:

भोर, 12 मे: पुणे जिल्ह्यातील भोर याठिकाणी एका महिलेनं आपल्या दिराच्या मदतीनं आपल्याच पतीचा काटा (wife killed husband) काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी महिलेनं आपल्या दिराच्या मदतीनं पतीची दगडानं ठेचून हत्या (murder) केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी दिरासह आरोपी महिलेस अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास भोर पोलिसांकडून केला जात आहे. हत्येच नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून आरोपींची चौकशी सुरू आहे.

देविका ऊर्फ भारती अमोल रांजाळे आणि किरण शंकर रांजाळे अशी अटक केलेल्या दिर भावजय यांची नावं आहे. आरोपी दीर-भावजय यांनी अमोल शंकर रांजाळे याची दगडानं ठेचून हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील जांभूळवाडी येथील रहिवासी असणारा किरण रांजाळे हा आठ - दहा दिवसांपूर्वी आपली भावजय देविकाला घेऊन भोर तालुक्यातील धानवली याठिकाणी आपल्या बहिणेकडे आला होता. यानंतर रविवारी (9 मे रोजी) आरोपी पत्नी देविकाचा पती अमोलही याठिकाणी आला होता.

हे वाचा-अंधश्रद्धेची बाधा! भूत काढतो म्हणून मांत्रिकाचा दारु पाजत विवाहितेवर अत्याचार

दुपारी अडीचच्या सुमारास तिघंही बहिणीच्या घरून बाहेर पडले आहे. आपल्या घरी परतत असताना, वाटेतचं कोणत्या तरी कारणांवरून त्यांच्यात वाद झाला. यामुळे आरोपी पत्नी देविकानं आपला दीर किरण शंकर रांजाळे याच्या मदतीनं आपल्या पतीचा काटा काढला आहे. आरोपींनी मृत अमोलची दगडानं ठेचून निर्घृण हत्या केली आहे. यानंतर त्यांनी मृत अमोलचा मृतदेह धानवलीच्या सोनजाई मंदिराजवळ टाकला.

हे वाचा-होणाऱ्या नवऱ्याला मारण्यासाठी शीतपेयातून दिलं विष; यवतमाळमधील वधूचा प्रताप

गावकऱ्यांना हा मृतदेह दिसल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. तर अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी दीर-भावजय यांना अटक केली आहे.

Published by: News18 Desk
First published: May 12, 2021, 9:37 AM IST

ताज्या बातम्या