Home /News /crime /

पत्नीने प्रियकरासह मिळून केली पतीची हत्या, एका मोबाइलमुळे असा झाला खुलासा

पत्नीने प्रियकरासह मिळून केली पतीची हत्या, एका मोबाइलमुळे असा झाला खुलासा

पत्नीने स्वत:च्या पतीची हत्या केल्याची (Wife killed Husband) धक्कादायक बाब उघड झाली आहे. आपल्या बॉयफ्रेंडसोबत (Boyfriend) मिळून तिने हे कृत्य केलं. घरात एका तुटलेल्या मोबाइल फोनवरुन (Mobile Phone) या धक्कादायक घटनेचा खुलासा झाला आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 25 जानेवारी : प्रेम आंधळं असतं असं अनेकदा ऐकलं आहे. प्रेमात अनेकांनी अनेक विचित्र, भयानक गोष्टी केल्याचंही समोर आलं आहे. प्रेमातून असाच आणखी एक प्रकार समोर आला असून पत्नीने तिच्या बाहेरील अफेअरमुळे स्वत:च्या पतीची हत्या केल्याची (Wife killed Husband) धक्कादायक बाब उघड झाली आहे. आपल्या बॉयफ्रेंडसोबत (Boyfriend) मिळून तिने हे कृत्य केलं. घरात एका तुटलेल्या मोबाइल फोनवरुन (Mobile Phone) या धक्कादायक घटनेचा खुलासा झाला आहे. ही घटना मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) राजगढ जिल्ह्यात घडली आहे. पत्नीने आपल्या बाहेर असलेल्या अफेअरमुळे हे धक्कादायक पाऊल उचललं. आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीची हत्या केली आहे. 22 जानेवारीच्या रात्री 30 वर्षीय रामदिनेश मीणा याची त्याच्यात घरात हत्या झाल्याची माहिती एसपी प्रदीप शर्मा यांनी दिली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला असता, पहिला संशय मृताच्या पत्नीवरच होता. ज्यादिवशी रामदिनेशची हत्या झाली, त्यादिवशी त्याच घरात त्याची पत्नीही झोपली होती. घरात पतीची हत्या झाली असताना, पत्नीला याबाबत काहीही माहित न पडणं हीच बाब पोलिसांना खटकली. तपासादरम्यान पोलिसांना एक तुटलेला फोन मिळाला. त्या फोनवरुन अधिक संशय आला. ज्यावेळी पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीची सक्तीने चौकशी केली, त्यावेळी या हत्येबाबत हैराण करणारा खुलासा झाला.

  हे वाचा - अकोल्यात सावत्र बापाचं किळसवाणं कृत्य; मुलगी गर्भवती झाल्यानंतर खुलासा!

  आरोपी महिला ज्योती मीणाने सांगितलं, की तिच्या गावात राहणाऱ्या चैनसिंह लोधाशी तिचे प्रेमसंबंध होते. महिलेला तिच्या प्रियकराने एक फोन घेऊन दिला होता. त्याच फोनवरुन ती त्याच्याशी बोलत होती. एक दिवस पतीने तिला मोबाइलवर बोलताना पाहिलं आणि मोबाइल रागात फोडला. त्यावरुन दोघांमध्ये भांडणं झालं. ही बाब महिलेने तिच्या प्रियकराला सांगितली. त्यानंतर त्याने आणखी एक नवा फोन तिला घेऊन दिला. त्यानंतर दोघांनी मिळून महिलेच्या पतीच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21-22 जानेवारीच्या रात्री पती झोपला असताना, महिला आपल्या दोन मुलांना घेऊन वरच्या खोलीत झोपली होती. त्याच रात्री तिने प्रियकराला आपल्या घरी बोलवलं आणि दांड्याने पतीच्या डोक्यात वार करत हत्या केली.

  हे वाचा - पतीचा अबोला झाला नाही सहन; लग्नाच्या 2 महिन्यात पत्नीने संपवलं जीवन!

  केवळ एका तुटलेल्या मोबाइलवरुन पोलिसांनी हत्येचा तपास लावला. तुटलेल्या मोबाइलवरुनच पोलिसांना महिलेवर शंका आली आणि आपल्याच पतीची हत्या करणाऱ्या आरोपी महिलेचा तपास लागला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिला ज्योती मीणा आणि तिचा प्रियकर चैनसिंह लोधा याला अटक केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Crime, Crime news, Madhya pradesh

  पुढील बातम्या