मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पतीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळताच पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, महिलेच्या कृत्याने सर्वांचाच थरकाप उडाला

पतीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळताच पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, महिलेच्या कृत्याने सर्वांचाच थरकाप उडाला

विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पतीची पत्नीने निर्घृण हत्या केली आहे. पतीच्या मृतदेहाचे तुकडे करुन तो घरातच काही दिवस ठेवला.

विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पतीची पत्नीने निर्घृण हत्या केली आहे. पतीच्या मृतदेहाचे तुकडे करुन तो घरातच काही दिवस ठेवला.

विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पतीची पत्नीने निर्घृण हत्या केली आहे. पतीच्या मृतदेहाचे तुकडे करुन तो घरातच काही दिवस ठेवला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Pravin Wakchoure

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर पत्नीने टोकाचं पाऊल उलचल पतीची निर्घृण हत्या केली. एवढेच नाही तर महिलेने पतीच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि मृतदेह घरातच ठेवला. काही दिवसांनी शेजाऱ्यांना महिलेच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा ही बाब उघडकीस आली. इराणमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी महिलेला पतीच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे.

द मिररच्या वृत्तानुसार, हे प्रकरण इराणच्या तेहरान प्रांतातील आहे. जिथे एका 22 वर्षीय महिलेला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. महिलेवर तिच्या पतीवर चाकूने वार करून हत्या आणि नंतर त्याच्या शरीराचे अनेक तुकडे केल्याचा आरोप आहे.

पुण्यातील महिलेला 12 लाखांचा गंडा घालणारी व्यक्ती काँगो देशातील, अखेर अटक!

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना तेहरान प्रांतातील इस्लामशहर गावात 30 व्यक्तीचा मृतदेह सापडला असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस अधिकाऱ्यांना महिलेच्या शेजारी राहणाऱ्यांचा फोन आला होता, ज्याने तिच्या घरातून उग्र वास येत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि शोध घेतला. त्यावेळी घरात मृतदेह आढळला.

काय आहे हत्येचं कारण?

महिलेने तिच्या पतीला त्याच्या मैत्रिणीसोबत पाहिले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद टोकाला गेल्यानंतर पतीने चाकूचा धाक दाखवत पत्नीला मारण्याची धमकी दिली. मात्र काही वेळातच महिलेनेच पतीच्या पोटात वार केले.

पुणे : लग्नाच्या 2 वर्षांनंतर दुसऱ्या लग्नाची तयारी; शेवटी पत्नीने भयंकर पद्धतीने मार्ग केला मोकळा

चौकशीदरम्यान महिलेने पोलिसांना सांगितले की, पती मला आणि माझ्या पाच वर्षांच्या मुलीला मारहाण करायचा. तो मलाही फसवत होता. मी त्याच्या वागण्यावर नाराज होतो, म्हणून मी त्याला जीवे मारले. महिलेने असा दावा केला आहे की तिने आपल्या पतीची हत्या दुसऱ्या महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे केली. महिलेचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते, तेव्हा ती फक्त 15 वर्षांची होती.

First published:

Tags: Crime news, Murder