मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पतीच्या फोनमध्ये दुसरीचा फोटो पाहून भडकली पत्नी; मध्यरात्रीच जे केलं ते हादरवून टाकणारं

पतीच्या फोनमध्ये दुसरीचा फोटो पाहून भडकली पत्नी; मध्यरात्रीच जे केलं ते हादरवून टाकणारं

पतीच्या हत्येनंतर (Murder of Husband) ही महिला रात्रभर तिथेच बसून राहिली. दुसऱ्या दिवशी जेव्हा युवकाचे आजोबा घरी पोहोचले तेव्हा ही घटना उघड झाली.

पतीच्या हत्येनंतर (Murder of Husband) ही महिला रात्रभर तिथेच बसून राहिली. दुसऱ्या दिवशी जेव्हा युवकाचे आजोबा घरी पोहोचले तेव्हा ही घटना उघड झाली.

पतीच्या हत्येनंतर (Murder of Husband) ही महिला रात्रभर तिथेच बसून राहिली. दुसऱ्या दिवशी जेव्हा युवकाचे आजोबा घरी पोहोचले तेव्हा ही घटना उघड झाली.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 31 ऑगस्ट : नुकतंच समोर आलेल्या एका घटनेत पतीच्या मोबाईलमध्ये दुसरीचा फोटो पाहून एक महिला भडकली. यानंतर रात्री तिनं पती झोपलेला असताना त्याच्या डोक्यावर वार केला आणि नंतर कुऱ्हाडीनं वार करत त्याची हत्या (Wife Killed Husband) केली. पतीच्या हत्येनंतर (Murder of Husband) ही महिला रात्रभर तिथेच बसून राहिली. दुसऱ्या दिवशी जेव्हा युवकाचे आजोबा घरी पोहोचले तेव्हा ही घटना उघड झाली. तोपर्यंत त्याची पत्नी गायब झाली होती. नंतर समोर आलं की त्याच्या पत्नीनं पोलिसांत जात सरेंडर केलं आहे. ही घटना छत्तीसगडच्या (Chhattisgarh) कोरियामधील बैकुंठपूर ठाण्याची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सारा पहाड पारा येथील निवासी भूपेंद्र राजवाडे यांचं लग्न दोन वर्षांपूर्वी मांजापारा येथील अनुराधासोबत झालं होतं. दोघांना एका वर्षाची मुलगीही आहे. युवक रविवारी संध्याकाळी उशिरा बाजारातून परतला आणि जेवण झाल्यानंतर तो झोपी गेला. यादरम्यान अनुराधा त्याचा मोबाईल पाहत होती. इतक्यात मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेचा फोटो पाहून ती भडकली आणि ती झोपेत असलेल्या भूपेंद्रची हत्या केली.

पतीच्या भयंकर कृत्यानं औरंगाबाद हादरलं; पत्नीसमोरच चिरला स्वत:चा गळा, कारण समोर

दुसऱ्या दिवशी जेव्हा युवकाचे आजोबा घरी आले तेव्हा त्यांना भूपेंद्रचा मृतदेह दिसला. त्याची पत्नी अनुराधा गायब होती. गावकऱ्यांनी सांगितलं, की अनुराधाला त्यांनी सकाळी गावातून बाहेर जाताना पाहिलं. अनुराधानं या हत्येनंतर घरातील रक्ताची डाग पुसून घेतले. भूपेंद्रच्या मृतदेहाला नवे कपडेही घातले. यानंतर ती संपूर्ण रात्र त्याच खोलीत थांबली आणि सकाळ होताच गावातून बाहेर गेली. पोलिसांनी घरातील काही वस्तून पुरावा म्हणून ताब्यात घेतल्या आहेत.

द्रविडच्या 'इंदिरानगर'मध्ये भीषण अपघात; ऑडी कारही नाही वाचवू शकली 7 जणांचे प्राण

पोलिसांनी सांगितलं, की भूपेंद्र सोलर फिटिंगचं काम करत असे. काही महिन्यांपासून तो जिल्ह्यातील बिहारपुरमध्ये राहून आपलं काम पाहत होता. यादरम्यान तो 15-20 दिवस घरीच जात नसे. याच कारणावरुन पती-पत्नीत अनेकदा वाद झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेआधीही मोबाईलमध्ये दिसलेला फोटो पाहून दोघांमध्ये वाद झाला होता. याचनंतर अनुराधानं झोपेत असलेल्या भूपेंद्रची हत्या केली. सुरुवातीला तिनं ही बाब लपवण्याचा प्रयत्न केला मात्र नंतर स्वतःच सरेंडर केलं.

First published:

Tags: Crime news, Murder news