Home /News /crime /

धक्कादायक..! झोपलेल्या पतीच्या अंगावर ओतलं साखर घालून उकळलेलं पाणी, कारण ऐकून थक्क व्हाल

धक्कादायक..! झोपलेल्या पतीच्या अंगावर ओतलं साखर घालून उकळलेलं पाणी, कारण ऐकून थक्क व्हाल

पत्नीनं पलंगावर झोपलेल्या तिच्या पतीवर साखर घालून उकळलेलं पाणी ओतल. त्यामुळं तिच्या पतीचा मृत्यू झाला. या प्रकारामुळं परिसरात खळबळ उडाली असून महिलेच्या कृत्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला.

    लंडन, 17 जून : पती-पत्नीमधील वाद हा प्रत्येक घराघरातील सर्वसामान्य विषय झाला आहे. पती-पत्नीमध्ये वाद (husband-wife clashes) होतच राहतात मात्र समजुतीनं ते लवकर मिटले तर ठीक आहे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. युनायटेड किंगडमच्या चेस्टरमध्ये खुनाचे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. वास्तविक येथे एका पत्नीनं पलंगावर झोपलेल्या तिच्या पतीवर साखर घालून उकळलेलं पाणी ओतल. त्यामुळं तिच्या पतीचा मृत्यू झाला. द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आपल्या पतीची क्रूरतेनं हत्या करणार्‍या महिलेचं नाव कोरिना स्मिथ असं असून ती 59 वर्षांची आहे. कोरीनाने एका बादलीत साखर टाकून उकळलेले पाणी आणूण तिच्या झोपलेल्या पतीच्या अंगावर ओतले. या घटनेत 80 वर्षांच्या मायकेल हे वाईटरित्या भाजले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे आपण केलेल्या प्रकारानंतर भानावर आलेल्या महिलेनेनंतर शेजारील घरात जावून एका महिलेला आपण नवऱ्याच्या अंगावर पाणी ओतल्याचं सांगितलं, त्यामुळं कदाचित नवऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. उपचारादरम्यान झाला मृत्यू  अंगावर उकळलेले पाणी ओतल्यानं मायकल हे 36 टक्के भाजले गेले होते. शेजारील संबंधित महिलेला पत्नीनं ही माहिती दिल्यानंतर ती ताबडतोब धावत त्यांच्या घरात आली आणि तिनं इतरांना याबाबत माहिती देवून तडफडणाऱ्या मायकल यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, उपचार सुरू असताना मायकल यांचा मृत्यू झाला. घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित पत्नीला अटक करून चेस्टरच्या न्यायालयात दाखल केले असता तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. हे वाचा - सावध व्हा! राज्याला तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका, आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट उकळलेल्या पाण्यात साखर का घातली नुसत्या उकळलेल्या पाण्यापेक्षा साखर घातल्याने ती चिकटून बसेल आणि नवऱ्याला जास्त त्रास करण्याच्या हेतूने या महिलेनं पाण्यात साखर घालण्याचा प्लॅन केला होता. याबाबत तिनं न्यायालयात माहिती दिली. गेल्या 14 जून रोजी हा सर्व धक्कादायक प्रकार घडला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Wife and husband

    पुढील बातम्या