Home /News /crime /

आधी खुर्चीला बांधलं, नंतर दिला इलेक्ट्रिक शॉक; थर्ड डिग्री टॉर्चर करत पत्नीनेच केला पतीचा गेम

आधी खुर्चीला बांधलं, नंतर दिला इलेक्ट्रिक शॉक; थर्ड डिग्री टॉर्चर करत पत्नीनेच केला पतीचा गेम

Representative Image

Representative Image

पत्नीने आपल्या पतीला शॉक देऊन त्याची हत्या (Wife Killed Husband) केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

  बिकानेर, 20 ऑगस्ट : राजस्थानमधील (Rajasthan) बिकानेर (Bikaner) येथे अतिशय धक्कादायक, हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या पतीला शॉक देऊन त्याची हत्या (Wife Killed Husband) केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेनंतर व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय महेंद्र दान नावाच्या व्यक्तीची त्याच्याच पत्नीने शॉक देऊन हत्या केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती रात्री कामावरुन घरी आल्यानंतर तिने त्याला जेवणातून गुंगीचं औषध दिलं. पती बेशुद्ध झाल्यानंतर पत्नीने त्याला खुर्चीवर बसवून त्याचे हात-पाय बांधले आणि त्याच्या पायाला शॉक दिला. त्यानंतर आरोपी पत्नीने पतीच्या भावाला आणि वडिलांना कॉल केला आणि पतीला शॉक लागल्याची माहिती दिली. त्यानंतर महेंद्रला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतु त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

  पत्नीवर उकळतं पाणी फेकत त्याने गाठला विक्रूतीचा कळस, समोर आलं संतापजनक कारण

  पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी महिलेने तिचा पती दारुडा असल्याचं सांगितलं. तो रोज मारहाण, शिवीगाळ करत असल्याने ती त्रासात होती. तसंच काही दिवसांपूर्वी पतीने दारुच्या नशेत आपल्या भावाशी भांडण केल्यानेही ती नाराज होती. त्याचाच बदला घेण्यासाठी तिने हे पाउल उचलल्याचं कबूल केलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या