Home /News /crime /

भयंकर घटना! महिलेनं चाकूने वार करत केली पतीची हत्या; मग कढईत शिजवले अवयव अन्..

भयंकर घटना! महिलेनं चाकूने वार करत केली पतीची हत्या; मग कढईत शिजवले अवयव अन्..

घटनेतील आरोपी टेरेसा तिच्या पतीच्या आळशीपणाला कंटाळली होती असं सांगितलं जात आहे. तिने आधी पतीला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर तिने त्याची हत्या केली.

    नवी दिल्ली 13 मे : पती-पत्नीचं नातं (Husband Wife Relation) अतिशय खास असतं. दोघंही एकमेकांना प्रत्येक संकटात आणि सुख-दुःखात साथ देण्याचं वचन देतात. मात्र सहसा आपल्या आजूबाजूला असं दिसून येतं की जोडप्यांमध्ये पत्नीला जास्त त्याग करावा लागतो. घरातील कामं असोत किंवा इतर कोणतीही जबाबदारी, महिलांना अधिक कष्ट घ्यावे लागतात. काही वेळा बायका यामुळे चिडतात. अशा एका घटनेत भडकलेल्या पत्नीने आपल्या पतीला ठार मारलं आणि नंतर त्याचा मृतदेह कापून कढईत शिजवला (Wife Killed Husband). ही बातमी समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. मेहुण्याच्या मृतदेहाचे 31 तुकडे केले, म्हणून आरोपीला दिली थरकाप उडवणारी शिक्षा घटनेतील आरोपी टेरेसा तिच्या पतीच्या आळशीपणाला कंटाळली होती असं सांगितलं जात आहे. तिने आधी पतीला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर तिने त्याची हत्या केली. एवढं करूनही तिचं समाधान झालं नाही, म्हणून तिने आपल्या पतीच्या शरीराचे छोटे तुकडे केले आणि नंतर ते एका मोठ्या कढईत शिजवण्यासाठी ठेवले. ही घटना सर्बियातील जरानिन येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना 10 मे रोजी रात्री 9 वाजता घडली. घटनेत रात्रीच जेवण एकटीने बनवत असल्याने चिडलेल्या महिलेनं पतीची हत्या केली. टेरेसाने ही हत्या केली तेव्हा तिची मुलगीही तिथे होती. तिने आपल्या आईविरुद्ध साक्ष दिली आहे. आईने आपल्या वडिलांना कसं मारलं हे तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि पोलिसांना सांगितलं. डी'एलजे असं या मुलीचे नाव आहे. ती टेरेसा यांच्या पहिल्या पतीची मुलगी आहे. आपल्या सावत्र वडिलांचा खून तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. तिने सांगितलं की, हत्येवेळी तिचे वडील दारूच्या नशेत होते. पण तरीही त्यांना धोक्याची जाणीव झाली. ते जीव वाचवण्यासाठी धावत होते आणि आई त्यांच्यावर चाकूने वार करत होती. डोळ्यावर व्रण अन् 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अपघात की घातपात? जळगावमधील घटना पतीच्या हलगर्जीपणाला आणि आळसाला कंटाळून हत्या केल्याचं टेरेसाने पोलिसांना सांगितलं. तिचा नवरा तिला घरच्या कामात अजिबात मदत करत नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये खूप भांडण व्हायचं. या जोडप्याचं भांडण शेजाऱ्यांनीही ऐकलं होतं. नुकतंच टेसेसाने झोपेत असताना पतीच्या पलंगाला आगही लावली होती. या घटनेत पतीचा जीव वाचला. मात्र यावेळी तिचा नवरा तिच्या तावडीतून वाचू शकला नाही. सध्या आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder news

    पुढील बातम्या