मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

10 दिवसांपूर्वी इन्स्टावर पोस्ट केलेली रील ठरली खरी; पतीसह बहिणीचाही खेळ खल्लास!

10 दिवसांपूर्वी इन्स्टावर पोस्ट केलेली रील ठरली खरी; पतीसह बहिणीचाही खेळ खल्लास!

रमेश पटेल यांची पत्नी गुड्डी ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर रील बनवण्याची शौकीन आहे. 7 जुलै रोजी गुड्डीने रील बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता.

रमेश पटेल यांची पत्नी गुड्डी ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर रील बनवण्याची शौकीन आहे. 7 जुलै रोजी गुड्डीने रील बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता.

रमेश पटेल यांची पत्नी गुड्डी ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर रील बनवण्याची शौकीन आहे. 7 जुलै रोजी गुड्डीने रील बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता.

  • Published by:  News18 Desk
जोधपूर, 22 जुलै : राजस्थानच्या जोधपूरमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली होती. याबाबत आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पत्नीने प्रियकरासह या हत्येचा कट रचला होता. या कटात पतीसोबत तिची बहीण कविताची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - मृत रमेश पटेल यांची पत्नी गुड्डी ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर रील बनवण्याची शौकीन आहे. 7 जुलै रोजी गुड्डीने रील बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. या रीलमध्‍ये ती लोखंडी खिडकीच्‍या सळ्यांच्या मागे उभी गाणे लाऊन उभी होती. या रीलमध्ये ती एका गाण्यासोबत स्वत:ला लोखंडी सळ्यांसारखी एक खिडकीच्या मागे उभी होती. मात्र, तिला काय माहित होते की, हाच रील तिच्या आयुष्यात वास्तव बनेल, तिच्या प्रियकरासह एकत्रितपणे रचलेल्या कटानंतर तिला खरोखरच तुरुंगात जावे लागेल. 17 जुलै रोजी रमेश पटेल (28) हे त्यांची चुलत बहीण कविता (25) हिला पटवारी पदावर सामील होण्यासाठी दुचाकीवरून जोधपूरला निघाले होते. लुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गावातून बाहेर पडताच एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि दुचाकी 200 मीटरपर्यंत खेचून नेली. यात रमेश आणि कविता यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा एक भयंकर अपघात आहे, असे वाटले. मात्र, पोलीस तपास धक्कादायक खुलासा झाला आहे. अंत्यसंस्कारानंतरच पोलिसांनी मृत रमेश पटेल यांची पत्नी गुड्डी हिला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपी पत्नी गुड्डीने पोलिसांना जे सांगितले त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. गुड्डीने पोलिसांना सांगितले की, शंकर पटेल आणि तिचे मागील अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध सुरू होते आणि गुड्डीने शंकरला पती रमेशला मारण्यास सांगितले होते. यामुळे शंकर पटेल याने या हत्येचा ठेका रमेश माळी याला दिला. त्याचसाठी रमेश माळी याने दिल्लीहून एक जुनी एसयूव्ही कार विकत घेतली आणि अन्य दोन जणांसोबत ही घटना घडवली. ही घटना घडवून आणण्यासाठी प्रेमिका गुड्डी पती रमेशच्या क्षणोक्षणी प्रियकर शंकरला अपडेट्स देत होती. जसे की, रमेश कधी आणि कोणत्या मार्गाने निघेल? त्यामुळे शंकर व रमेश माळी यांनी अपघात झाल्यासारखे वाटेल, अशा पद्धतीने ही हत्या केली. हेही वाचा - प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार, न्यूड व्हिडिओ काढून लग्नानंतरही करीत राहिला भयंकर मागणी मात्र, गुन्हा कितीही लपवला तरी तो समोर येतोच. या प्रकरणातही तोच प्रकार घडला आणि सत्य समोर आले. रमेश माळी आणि गुडीसह आणखी दोन गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस शंकर पटेलचा शोध घेत आहेत.
First published:

Tags: Crime news, Rajasthan, Women extramarital affair

पुढील बातम्या