मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /5 वर्षांपूर्वी केलं Love Marriage, पण बायकोचं 4 वर्षांपासून बाहेर अफेअर, नवऱ्यासोबत घडलं भयानक कांड

5 वर्षांपूर्वी केलं Love Marriage, पण बायकोचं 4 वर्षांपासून बाहेर अफेअर, नवऱ्यासोबत घडलं भयानक कांड

अटक करण्यात आलेले आरोपी

अटक करण्यात आलेले आरोपी

लव्ह मॅरेज केल्यानंतरही पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते. यानंतर पतीसोबत धक्कादायक घटना घडली.

  • Local18
  • Last Updated :
  • Bokaro, India

मृत्युंजय कुमार, प्रतिनिधी

बोकारो, 17 मार्च : देशात अनैतिक संबंधात वाढ होत असल्याचे दिसत आहे. यातूनच हत्या आणि आत्महत्येसारखे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. 12 मार्च रोजी बोकारोच्या बलिदिह पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या विनोद हेंब्रमच्या हत्येची उकल झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली होती. या प्रकरणी मृताची पत्नी लक्ष्मी कुमारी आणि तिचा प्रियकर रोशन भारती याला अटक करण्यात आली आहे. हत्येत वापरलेला धारदार चाकू बोकारो रेल्वे स्थानकाच्या मार्गावरून जप्त करण्यात आला आहे. मृत विनोद हेंब्रमची पत्नी ख्रिश्चन समाजातील होती. जिच्यासोबत विनोदने 5 वर्षांपूर्वी लग्न केले होते.

पत्नीचे चार वर्षांपासून दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध -

हत्येतील आरोपी रोशन भारती याला बलिदिह पोलिसांनी बिहारमधील मुझफ्फरपूर येथून अटक केली आहे. विनोदची सायकलही मुझफ्फरपूरमधून जप्त करण्यात आली आहे. मुख्यालयाचे डीएसपी मुकेश कुमार यांनी सांगितले की, लक्ष्मी आणि विनोद यांचा 5 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. रोशन भारती आणि लक्ष्मी यांच्यात चार वर्षांपूर्वीपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघेही ख्रिश्चन धर्माचे आहेत.

मात्र, पत्नीचे हे विवाहबाह्य संबंध विनोदला पसंत नव्हते. त्यामुळे लक्ष्मी आणि रोशन या दोघांनी विनोद हेंब्रमच्या हत्येचा कट रचला. 12 रोजी रात्री विनोद हा सायकलने बोकारो स्टील प्लांटकडे जात होता. त्याचवेळी झाडीत आधीच बसलेल्या रोशन भारती याने विनोद हेंब्रम याच्यावर चाकून हल्ला करत त्याची हत्या केली. यानंतर त्याने तिथून पळ काढला. तसेच खुनात वापरलेले धारदार शस्त्र त्याने वाटेत फेकून दिले. आणि सायकल घेऊन मुझफ्फरपूरला गेला.

दोन्ही विवाहित तरी होते अनैतिक संबंधात, आधी दारु पिऊन ठेवले शारिरीक संबध, मग प्रेयसीचं पुजाऱ्यासोबत भयानक कांड

डीएसपींनी सांगितले की, तांत्रिक सहाय्याने संपूर्ण प्रकरणाचे उद्घाटन करण्यात आले आहे. रोशन भारतीला मुझफ्फरपूरमध्ये अटक केल्यानंतर लक्ष्मीचा या हत्येतील सहभाग समोर आला. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. चौकशीत दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

First published:

Tags: Crime news, Jharkhand, Murder news, Physical Relationship, Women extramarital affair