Home /News /crime /

दिली सुपारी नवऱ्याची: अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या साथीने काढला काटा

दिली सुपारी नवऱ्याची: अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या साथीने काढला काटा

येथे संयोगितागंज पोलिसांनी मृत तरुणीचे शव पोस्टमार्टमसाठी दिले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.

येथे संयोगितागंज पोलिसांनी मृत तरुणीचे शव पोस्टमार्टमसाठी दिले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.

अनैतिक नात्यामध्ये अडथळा बनणाऱ्या पतीचा त्याच्या पत्नीने 5 लाखांची सुपारी देऊन खून केला.

    इज्जतनगर, 09 नोव्हेंबर: अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा त्याच्याच पत्नीने काटा काढला. आपल्या प्रियकराच्या साथीने तिने पतीची 5 लाखांची सुपारी दिली. विनिताचा पती तिच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता. त्यात दिसायला सुंदर असलेल्या विनिताला स्वत:च्या रुपाचा फार गर्व होता. म्हणून प्रेमाच्या मार्गात अडचण ठरणाऱ्या नवऱ्याला ठार केलं. याप्रकरणी विनितासह 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. त्याचा शोध सध्या सुरू आहे. असा आखला हत्येचा कट अधवेश असं तिच्या नवऱ्याचं नाव होतं. तो उत्तर प्रदेशच्या इज्जतनगर इथला राहणारा होता. या घटनेमुळे इज्जतनगर परिसरात खळबळ माजली आहे. अधवेश तिथल्याच एका कॉलेजमध्ये काम करायचा. विनिता आणि अधवेशमध्ये बरेचदा वाद व्हायचे. त्यामुळे अधवेशवर संतापलेल्या विनिताने तिचा प्रियकर आणि माहेरच्या लोकांना हाताशी घेऊन त्याला ठार मारायचा प्लान आखला. अधवेशची 5 लाखाची सुपारी दिली. त्याला ठार केल्यानंतर त्याचं शव फिरोदाबाद इथे नेऊन पुरून टाकलं. यावेळी तिचे वडील, भाऊ, बहीण आणि इतर 2 जणं तिच्यासोबत होते. इज्जतनगर पोलीस ठाण्यात अधवेशच्या आई वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. एसएसपी रोहित सिंह सजवाण आणि त्यांची टीम पुढील तपास करत आहे. याप्रकरणी विनितासह अन्य 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे. अधवेशच्या मृत्यूमुळे त्याच्या आई वडिलांवर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अधवेशच्या मारेकऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्या अशी मागणी त्याच्या आईने केली आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या