मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पतीने जीन्स घालण्यास दिला नकार, चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पत्नीने उचललं भयानक पाऊल

पतीने जीन्स घालण्यास दिला नकार, चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पत्नीने उचललं भयानक पाऊल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

जोरभिटा गावात पत्नीला जीन्स घालण्यास विरोध करणे पतीला महागात पडले. पतीने जीन्स घालण्यास विरोध केल्याने संतापलेल्या पत्नीने चाकू उचलला आणि पतीवर चाकूने वार करून पतीला जबर जखमी केले.

जामताडा, 18 जुलै : झारखंडमध्ये पती-पत्नीमधील वादाचे रुपांतर टोकात झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना झारखंडच्या जामतारा येथील आहे. आंदोलन तुडू असे मृत पतीचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

जोरभिटा गावात पत्नीला जीन्स घालण्यास विरोध करणे पतीला महागात पडले. पतीने जीन्स घालण्यास विरोध केल्याने संतापलेल्या पत्नीने चाकू उचलला आणि पतीवर चाकूने वार करून पतीला जबर जखमी केले. यानंतर जखमी पतीला धनबाद येथील पीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 12 जुलै रोजी संध्याकाळी पत्नी पुष्पा हेमब्रम काही लोकांसोबत जीन्स घालून गोपालपूर गावात जत्रा पाहण्यासाठी गेली होती. पती आंदोलन तुडू याने पत्नीला जीन्स घातलेली पाहिल्यानंतर त्यावर आक्षेप घेतला. तसेच तुझे लग्न झाले आहे, आता तू जीन्स घालायची नाही, असे सांगितले. तीच गोष्ट पुष्पा हेमब्रमला खटकली आणि पुष्पाने विरोध करत पतीसोबत भांडण केले. यादरम्यान तिने रागाच्या भरात चाकू उचलला आणि नंतर चाकूने पतीवर वार केले.

हेही वाचा - बायको स्वत:जवळ झोपू देत नव्हती, रागाच्या भरात पतीनं उचललं टोकाचं पाऊल

या घटनेसंदर्भात मृत आंदोलन तुडूचे वडील कर्णेश्वर तुडू यांनी सांगितले की, चार महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाचे लग्न झाले होते. सुनेने जत्रा पाहून घरी परतल्यावर मुलगा आंदोलन तुडूने जीन्स घालण्यास नकार दिला होता, यामुळे त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी आरोपी पत्नी पुष्पा हिने आपला गुन्हा मान्य केला आहे. जामतारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अब्दुल रहमान यांनी सांगितले की, उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने धनबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

First published:

Tags: Crime news, Jharkhand, Murder