Murder News : महिलेनं तीन प्रियकरांसोबत मिळून केली पतीची हत्या, असा झाला घटनेचा उलगडा

Murder News : महिलेनं तीन प्रियकरांसोबत मिळून केली पतीची हत्या, असा झाला घटनेचा उलगडा

एका 50 वर्षीय व्यक्तीची हत्या त्याच्याच पत्नीनं आपल्या प्रियकरांसोबत (Boyfriend) मिळून केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या अवैध संबंधाला तिचा पती विरोध करत होता.

  • Share this:

हरदोई 6 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात 5 दिवसांपूर्वी झालेल्या एका हत्येचा (Murder) उलगडा  करण्यात पोलिसांना यश आलं आहे. एका 50 वर्षीय व्यक्तीची हत्या त्याच्याच पत्नीनं आपल्या प्रियकरांसोबत (Boyfriend) मिळून केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या अवैध संबंधाला तिचा पती विरोध करत होता. या गोष्टीचा राग आल्यानं महिलेनं आपल्या प्रियकरांसोबत मिळून स्वतःच्याच पतीची घरातच कुऱ्हाडीनं हत्या केली.

इतकंच नाही, तर या महिलेनं आपल्या पतीच्या हत्येचा आरोप एका प्रियकरावर लावला. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरू केली, तेव्हा मुळ सुत्रधार मृत व्यक्तीची पत्नीचं असल्याचं समोर आलं. पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यासाठी मृताची पत्नी आणि तिच्या 3 प्रियकरांना अटक केली आहे.

ही घटना हरदोई जिल्ह्यातील कोतवाली बिलग्राम परिसरातील आहे. पोलिसांनी ठाण्याच्या क्षेत्रातील रामपूर मझियाराचे रहिवासी असलेल्या अवतार कश्यप यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी चमेली आणि तिचे प्रियकर ऋषिपाल, विजयपाल आणि रामसेवर यांनी अटक केली आहे.

अप्पर पोलीस अधिक्षक अनिल कुमार म्हणाले, की 31 जानेवारीच्या रात्री घराच्या बाहेर राम अवतार कश्यप यांची कुऱ्हाडीनं वार करत निर्दयीपणे हत्या केली गेली. याप्रकरणी मृताच्या पत्नीनं आपला प्रियकर ऋषिपाल यादव आणि गावातीलच मन्नू आणि सोनेलाल यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. मात्र, पोलिसांनी तपास करण्यास सुरूवात केल्यानंतर पत्नीच या सर्व प्रकरणाची मास्टरमाइंड असल्याची धक्कादायक माहिती त्यांच्या समोर आली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेचे ऋषिपाल यादव, रामसेवक आणि विजयपाल यांच्यासोबत अवैध संबंध होते. गेल्या एका वर्षापासून ही महिला ऋषिपाल यादवसोबत राहात होती. तर, 20 दिवसांपूर्वीच ती आपल्या पतीच्या घरी माघारी आली होती. यानंतर ऋषिपाल महिलेला घ्यायला तिच्या घरी आला असता राम अवतार आणि ऋषिपालमध्ये वाद झाला. राम अवतार पत्नीच्या अवैध संबंधांना विरोध करत होता आणि तिला ऋषिपालसोबत जाण्यास मनाई करत होता. यानंतर अवैध संबंधांमुळे या महिलेनं आपल्या प्रियकरांसोबत मिळून पतीची हत्या केली. तपासात महिलाच मुख्य सुत्रधार असल्याचं समोर आल्यानं पोलिसांनी तिच्यासह तिच्या 3 प्रियकरांनाही अटक केली आहे.

Published by: Kiran Pharate
First published: February 6, 2021, 3:26 PM IST

ताज्या बातम्या