पती कामावरुन उशिरा घरी आला म्हणून पत्नीने काढला राग; रुग्णालयात भरती झाल्यावर म्हणाली...SORRY

पती कामावरुन उशिरा घरी आला म्हणून पत्नीने काढला राग; रुग्णालयात भरती झाल्यावर म्हणाली...SORRY

काही वेळेस मात्र पती-पत्नींमधील वादात अनेक धक्कादायक घटनाही घडतात.

  • Share this:

भोपाळ, 7  जानेवारी : मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) हृदयद्रावक प्रकरण समोर आलं आहे. तसं पाहता पती-पत्नीमधील भांडण हे नित्याचेच असतात. भांडण करुन नंतर ते गोडही होतात. मात्र काही वेळेस यामध्ये अनेक धक्कादायक घटनाही घडतात. अशीच एक घटना मध्यप्रदेशातील एका कुटुंबात घडली आहे. येथील एका पत्नीने झोपलेल्या पतीच्या चेहऱ्यावर गरम तेल ओतले. यानंतर तिचा पती गंभीररित्या भाजला गेला. सध्या त्याच्यावर बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आदल्या रात्री झालं होतं भांडण

सागर येथे राहणाऱ्या 38 वर्षीय अरविंद अहिरवार हा रोजंदारीवर काम करतो. 4 वर्षापूर्वी त्याचे शिवकुमारीशी लग्न झालं होतं. रात्री अरविंदच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार अरविदं आणि वहिणीत वाद झाला होता. यानंतर आई-वडिलांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवलं. पण दुसर्‍या दिवशी पहाटे पाच वाजता वहिणीने पती झोपलेला असताना त्याच्या चेहऱ्यावर उकळतं तेल ओतले, असे त्याने सांगितलं.

हे ही वाचा-कडक सॅल्यूट! आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पाण्यातून खेचून काढलं

पत्नीने असं का केलं?

काल रात्री उशिरा अरविंद अहिरवार कामावरून उशिरा घरी परतला. यावरुन पती-पत्नीमध्ये वाद झाला. यानंतर, दुसर्‍या दिवशी सकाळी, जेव्हा संपूर्ण कुटुंब झोपलेलं होतं, तेव्हा पत्नीने नवऱ्याच्या चेहऱ्यावर गरम तेल ओतले. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले आणि शिवकुमारीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अनेकदा नवरा-बायकोमध्ये होत होते वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवकुमारी अहिरवार हिच नवरा अरविंद अहिरवार याच्याशी कामावरून उशिरा घेण्यावरुन वाद होत होते. घटनेच्या आदल्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला आणि चिडलेल्या पत्नीने पतीच्या चेहऱ्यावर गरम तेल ओतले. त्यांच्या खोलीतून आवाज ऐकल्यानं कुटुंबीय खोलीत पोहोचले आणि अरविंदला उपचारासाठी रुग्णालयात नेले.

महिला म्हणाली, चूक झाली..

या घटनेनंतर शिवकुमारी अहिरराव हिने आपल्या कृत्याबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. अरविंदच्या भावाने सांगितलं की, दोघांमध्ये भांडण झाल्यापासून वहिनी रडत आहे. याशिवाय तिच्याकडून चूक झाल्याचं ती मान्य करीत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: January 7, 2021, 10:39 AM IST

ताज्या बातम्या