Home /News /crime /

क्रूरता! पत्नीने तंबाखू दिली नाही म्हणून डोळ्यात घातलं जळतं लाकूड, महिलेचा मृत्यू

क्रूरता! पत्नीने तंबाखू दिली नाही म्हणून डोळ्यात घातलं जळतं लाकूड, महिलेचा मृत्यू

आपल्या हातून पत्नीचा खून झाल्याची माहिती कुणाला कळू नये म्हणून त्याने घराजवळ मोठा खड्डा खोदला.

आपल्या हातून पत्नीचा खून झाल्याची माहिती कुणाला कळू नये म्हणून त्याने घराजवळ मोठा खड्डा खोदला.

`पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) करण्यात आली आहे,` असं हर्षवर्धन बैस यांनी सांगितलं.

    रायपूर, 17 डिसेंबर : नशेत असलेल्या पतीनं पत्नीकडे तंबाखू (Tobacco) मागितला; मात्र पत्नीने तंबाखू न दिल्यानं पतीने रागाच्या भरात पत्नीची निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना झारखंडमधल्या (Jharkhand) गरियाबंद जिल्ह्यात घडली आहे. मैनपूर पोलिसांनी या प्रकरणी पतीला अटक केली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या घटनेचं वृत्त `लाइव्ह हिंदुस्थान`ने दिलं आहे. याबाबत मैनपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी हर्षवर्धन बैस यांनी सांगितलं, `फूलसिंह नेताम (वय 57) असं आरोपीचं (Accused) नाव असून, घटना घडली त्या वेळी तो नशेत होता. त्याने त्याची पत्नी रमुलाबाई (वय 52) हिच्याकडे तंबाखू मागितला. तिने तंबाखू देण्यास नकार दिल्यानं चिडलेल्या फूलसिंह नेतामनं स्वयंपाकघरातल्या चुलीतलं जळतं लाकूड तिच्या डोक्यात मारलं. या हल्ल्यात रमुलाबाईच्या डोक्याला जबर दुखापत झाली. यानंतरही फूलसिंह याचा राग शांत झाला नाही. त्यामुळे त्यानं रागाच्या भरात चुलीतून दुसरं जळतं लाकूड काढून ते रमुलाबाईच्या डोळ्यात घातलं. यात रमुलाबाईचा जागीच मृत्यू झाला.` घटनेनंतर आरोपी फूलसिंह नेतामनं गुन्हा लपवण्याचा पुरेपर प्रयत्न केला. पत्नी माहेरी गेली असल्याचं त्यानं ग्रामस्थांना सांगितलं. मृत रमुलाबाईचा मुलगा रामजी नेताम यानं याबाबत माहिती दिली तेव्हा घटनेचा खुलासा झाला, असं पोलिसांनी (Police) सांगितलं. याबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रेश ठाकूर म्हणाले, `आदिवासी भागातल्या मैनपूरमधल्या कुल्हाडीघाट गावात एका नाल्यात महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मृत महिलेचं नाव रमुलाबाई असून, तिचा पती फूलसिंह नेतामनं तिची हत्या केल्याचं तपासात स्पष्ट झालं. आरोपीची चौकशी केली असता, त्यानं घटनाक्रम सांगितला. 'मी माझ्या पत्नीकडे तंबाखू मागितला. तिनं तंबाखू देण्यास नकार दिल्यानं मी चिडून स्वयंपाकघरातल्या चुलीतल्या जळत्या लाकडानं तिच्यावर हल्ला केला. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर मी तिच्या उजव्या डोळ्यात जळतं लाकूड घातलं. रमुलाबाई तिचा जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळत गेली आणि खड्ड्यात पडली,' अशी कबुली फूलसिंहनं दिली.` हे ही वाचा-अचानक आलेल्या पतीला पाहून बॉयफ्रेंडला लटकवलं बाल्कनीत, हात सुटून झाला मृत्यू `पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) करण्यात आली आहे,` असं हर्षवर्धन बैस यांनी सांगितलं.
    First published:

    Tags: Crime news, Murder, Wife and husband

    पुढील बातम्या