मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पत्नीने आत्महत्या केल्याचे कळताच जवानाने ऑन ड्युटी झाडली स्वत:वर गोळी, गडचिरोलीतील घटना

पत्नीने आत्महत्या केल्याचे कळताच जवानाने ऑन ड्युटी झाडली स्वत:वर गोळी, गडचिरोलीतील घटना

चंद्रभूषण जगत असं जवानाचं नाव आहे. या जवानाने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

चंद्रभूषण जगत असं जवानाचं नाव आहे. या जवानाने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

चंद्रभूषण जगत असं जवानाचं नाव आहे. या जवानाने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

गडचिरोली, 10 मार्च : देशभरात एकीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीची धामधुम सुरू असताना गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी समजताच एक सीआरपीएफ जवानाने (CRPF soldiers) स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (commits suicide) केल्याची  घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. चंद्रभूषण जगत असं जवानाचं नाव आहे. या जवानाने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

(उत्पल पर्रीकरांना परत भाजपात घेणार का? देवेंद्र फडणवीस म्हणतात....)

गडचिरोली जिल्ह्यात धानोरा पोलीस ठाण्यात केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा कॅम्प आहे. या कॅम्पमध्ये चंद्रभूषण जगत हे जवान कार्यरत आहेत या जवानांचे कुटुंबिय बाहेर गावी मुक्कामाने असते.  आज सकाळी या जवानाला त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी समजली. ही बातमी समजताच कर्तव्यावर असलेल्या चंद्रभूषण याने स्वतःकडे असलेल्या बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केली त्याला रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

('माझ्याशी वाईट वागणाऱ्यांना मी सोडत नाही...'. तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत)

चंद्रभूषण हा छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्याची पत्नी त्याच्या गावी राहत होती. काही महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याच्या पत्नीने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी या जवानाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

पतीच्या मारहाणीनंतर पत्नीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

तर दुसरीकडे,  हिंगोली (Hingoli) जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील राजदरी याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका महिलेनं पतीच्या मारहाणीला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न (Mother attempt to commit suicide by drink poison) केला होता. पण विष प्राशन करताच त्यांना अचानक आश्रमशाळेत शिकणाऱ्या आपल्या मुलांची आठवण येऊ लागली. त्यामुळे त्यांनी अखेरच्या वेळी मुलांना पाहण्यासाठी विष प्राशन केल्याच्या स्थितीत पायपीट करत मुलांची शाळा गाठली. आईची अवस्था पाहून मुलांनी ओक्साबोक्सी रडायला सुरुवात केली.

हा प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने प्रसंगावधान दाखवत काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं महिलेला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. याठिकाणी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर रुग्णवाहिका बोलावून त्यांना पुढील उपचारासाठी औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जात असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. सुवर्णमाला बोचरे असं संबंधित महिलेचं नाव असून त्या औंढा नागनाथ तालुक्यातील राजदरी येथील रहिवासी आहेत. सध्या सुवर्णमाला यांच्यावर औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जात असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

First published: