मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुणे : लग्नाच्या 2 वर्षांनंतर दुसऱ्या लग्नाची तयारी; शेवटी पत्नीने भयंकर पद्धतीने मार्ग केला मोकळा

पुणे : लग्नाच्या 2 वर्षांनंतर दुसऱ्या लग्नाची तयारी; शेवटी पत्नीने भयंकर पद्धतीने मार्ग केला मोकळा

दीपाली व समाधान गायकवाड यांचा विवाह झाला होता. मात्र, दोन वर्षापासून पती हा मला दुसरे लग्न करायचे सांगत होता.

दीपाली व समाधान गायकवाड यांचा विवाह झाला होता. मात्र, दोन वर्षापासून पती हा मला दुसरे लग्न करायचे सांगत होता.

दीपाली व समाधान गायकवाड यांचा विवाह झाला होता. मात्र, दोन वर्षापासून पती हा मला दुसरे लग्न करायचे सांगत होता.

    पुणे, 12 ऑगस्ट : राज्यात सध्या दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये तसेच कौटुंबिक कलहाच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला दुसरे लग्न करायचे असल्याचे त्याने पत्नीला सांगितल्यानंतर पत्नीने पतीच्या छळास कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - मला दुसरे लग्न करायचे असल्याचे पतीने एका पत्नीला सांगितले होते. तसेच तू माझ्या आयुष्यातून निघून जा नाही तर मी तुला मारुन टाकीन, असे सातत्याने तो आपल्या पत्नीला धमकी देत होते. त्यामुळे दुसरे लग्न करण्यासाठी पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपाली समाधान गायकवाड (वय 30, रा. केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. गुन्हा दाखल - याप्रकरणी जयश्री दुर्योधन सोनवते (वय 48, रा. राहुलनगर, निगडी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समाधान मारुती गायकवाड (रा. केशवनगर, मुंढवा, मुळ बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मुंढव्यातील केशवनगर येथे गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजता घडला. दीपाली व समाधान गायकवाड यांचा विवाह झाला होता. मात्र, दोन वर्षापासून पती हा मला दुसरे लग्न करायचे सांगत होता. तसेच दिपालीला शिवीगाळ करुन वारंवार मारहाण करीत होता. या संपूर्ण छळाला दिपाली कंटाळली होती. त्यामुळे तिने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. हेही वाचा - एका गुन्ह्याची उकल करण्यासाठी बिहारमधून पुण्यात आलेली महिला पोलीस; हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या याप्रकरणी जयश्री दुर्योधन सोनवते यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या कारणावरुन पोलिसांनी समाधान गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिनवडे करीत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या