मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मोठ्या उत्साहात लग्नमंडपात पोहोचला नवरदेव; फुलांनी स्वागत तर सोडाच, लाथा-बुक्क्यांचा मिळाला प्रसाद

मोठ्या उत्साहात लग्नमंडपात पोहोचला नवरदेव; फुलांनी स्वागत तर सोडाच, लाथा-बुक्क्यांचा मिळाला प्रसाद

या व्यक्तीच्या पहिल्या पत्नीला समजलं की आपला पत्नी लग्न करायला निघाला आहे. यानंतर ती लगेचच थेट नवरीच्या घरी पोहोचली

या व्यक्तीच्या पहिल्या पत्नीला समजलं की आपला पत्नी लग्न करायला निघाला आहे. यानंतर ती लगेचच थेट नवरीच्या घरी पोहोचली

या व्यक्तीच्या पहिल्या पत्नीला समजलं की आपला पत्नी लग्न करायला निघाला आहे. यानंतर ती लगेचच थेट नवरीच्या घरी पोहोचली

  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 07 डिसेंबर : सध्या लग्नाचा सीझन (Wedding Season 2021) सुरू आहे. त्यामुळे लग्नमंडपात घडलेल्या विचित्र किंवा अजब घटना सतत ऐकायला मिळतात. सध्या अशीच एका नवरदेवासोबत घडलेली घटना चांगलीच चर्चेत आहे. आधीपासून विवाहित असलेला हा व्यक्ती दुसरं लग्न करायला निघाला होता. त्याने मुलीकडच्यांना या गोष्टीची भनकही लागू दिली नव्हती की त्याचं लग्न झालेलं आहे. मात्र, या व्यक्तीच्या पहिल्या पत्नीला समजलं की आपला पत्नी लग्न करायला निघाला आहे. यानंतर ती लगेचच थेट नवरीच्या घरी पोहोचली (Woman Came in Husband's Second Marriage).

यानंतर नवरदेवाचे जी अवस्था झाली, त्याबद्दल त्याने कधी विचारही केला नसेल. ही घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील आहे. गोरखपूरच्या सूबाबाजार येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचं लग्न एका वर्षापूर्वी गुलरिहा ठाणा क्षेत्रातील एका गावात ठरलं होतं. रविवारी पाच डिसेंबरला तो वरात घेऊन त्याठिकाणी पोहोचला. मात्र, याआधीच त्याची पत्नी याठिकाणी आपल्या चार वर्षीय मुलासोबत पोहोचली होती. नवरदेवाची नजर आपली पहिल्या पत्नीवर पडताच तो पळू लागला. आसपासच्या लोकांनी नवरदेवाला पळताना पाहून त्याला पकडलं आणि यानंतर त्याची पोलखोल झाली. यानंतर वधू पक्षाकडील लोकांनी नवरदेवाची चांगलीच धुलाई केली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

घटनास्थळी पोहोचत गुलरिहा पोलिसांनी आरोपी नवरदेवाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. मुलासोबत त्याठिकाणी उपस्थित असलेल्या महिलेनं सांगितलं, की पाच वर्षापूर्वी तिचं या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. त्यांना चार वर्षाचा मुलगाही आहे. आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नाबाबत माहिती मिळताच ती इथे पोहोचली, जेणेकरून तिच्या पतीने हे दुसरं लग्न करू नये. आरोपी नवरदेव पोलिसांसमोर माफी मागू लागला. ज्या मुलीला अंधारात ठेवून या युवकाने लग्न जमवलं होतं, तिच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला तुरुंगात पाठवलं आहे.

First published:

Tags: Shocking news, Wedding