Home /News /crime /

क्रूरतेचा कळस! पतीची हत्या करून मृतदेहासोबत ठेवले संबंध; मग शरीराचे तुकडे केले अन्...

क्रूरतेचा कळस! पतीची हत्या करून मृतदेहासोबत ठेवले संबंध; मग शरीराचे तुकडे केले अन्...

या महिलेनं पतीला विष देऊन त्याची हत्या केली. यानंतर तिनं पतीच्या मृतदेहासोहत शारीरिक संबंध ठेवले (Woman Has Sex With Dead Husband). एवढ्यावरही महिला शांत बसली नाही

    नवी दिल्ली 30 ऑक्टोबर : रशियातील एका महिलेनं आपल्या पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहासोबत अतिशय धक्कादायक कृत्य केलं (Wife Brutally Killed Husband). असा आरोप आहे, की या महिलेनं पतीला विष देऊन त्याची हत्या केली. यानंतर तिनं पतीच्या मृतदेहासोहत शारीरिक संबंध ठेवले (Woman Has Sex With Dead Husband). एवढ्यावरही महिला शांत बसली नाही तर तिनं क्रूरतेचा कळस गाठत पतीच्या शरीराचे तुकडे केले आणि त्याचं रक्तही पिलं. पतीच्या हत्येप्रकरणी या महिलेला अटकही झाली. मात्र, पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने सुनावणीनंतर तिला सोडून देण्यात आलं. परंतु तिच्यावर अजूनही केस सुरू आहे. झोपेतच पत्नीला संपवलं;काही तासात भयावह अवस्थेत आढळला पती, जळगावातील खळबळजनक घटना मिरर यूकेनं दिलेल्या वृत्तानुसार, सेंट पीटर्सबर्ग येथे राहणाऱ्या या ३७ वर्षीय आरोपी महिलेचं नाव मरीना कोखल असं आहे. तिनं आपला पती अॅन्डी कार्टराईटची हत्या केल्याचा आरोप आहे. महिलेचा पती एक रॅपर होता. त्याच्या हत्येच्या प्रकरणात मरीना ही मुख्य संशियत असल्याने तिला नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. आपल्या पतीच्या हत्येप्रकरणी मरीना हिला मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात अटक करण्यात आलेली. वकिलांनी मरीनावर आरोप केलेले की तिनं आपल्या 68 वर्षीय पतीला विष देऊन त्याची हत्या केली. यानंतर त्याच्या मृतदेहासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचं रक्तही पिलं. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचं एक २५ वर्षाच्या तरुणीसोबत अफेअर होतं. डेटसाठी गेली पण...; प्रियकराने तरुणीची केली वाईट अवस्था, थेट रुग्णालयातच पोहोचली मिळालेल्या माहितीनुसार, असं सांगितलं गेलं की या व्यक्तीचा मृतदेह कापून त्याचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले. तसंच त्याची बोटं उंदरांना खाऊ घातली गेली. परंतु फॉरेन्सिक तज्ज्ञांना याचे काहीही पुरावे सापडले नाहीत. मृतदेहाचा एकही तुकडा घरात सापडलेला नाही. तिनं या हत्येनंतर घरं, भांडी आणि घरातील सर्व वस्तू धुतल्या होत्या तसंच काही अवयव वॉशिंग मशीनमध्ये टाकून नष्ट केले होते. तिच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोपही आहे. मात्र, पुरावे जमा करण्यात अपयश आल्यानं महिलेला तुरुंगातून सोडण्यात आलं आहे. कोर्टातून निघताना ती हसत बाहेर पडली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime, Murder news, Sex

    पुढील बातम्या