जयपूर, 28 डिसेंबर: दलालाला (Agent) तब्बल 3 लाख रुपये (Rs. 3 Lakh) देऊन ज्या तरुणीशी लग्न (Marriage) केलं, ती तरुणी 15 दिवसांतच पळून गेल्यामुळे (Absconded) पतीला जबर मानसिक धक्का (Mental shock) बसला आहे. लग्न होत नसल्यामुळे काहीही करून पत्नीचा शोध घेण्याचा विडा तरुणाने उचलला होता. त्यासाठी एका दलालाला तो भेटला आणि लग्नाची बोलणी केली. तरुण लग्नासाठी इतका उतावीळ होता की स्वतःकडचे 3 लाख रुपये दलालाला देऊन तो लग्नासाठी तयार झाला. मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
अशी घडली घटना
राजस्थानच्या डुंगरपूर भागात राहणाऱ्या अटल बिहारी जैन यानं गुलाब सिंह नावाच्या एका दलालाची भेट घेतली. लग्नासाठी आपल्या ओळखीतली एक मुलगी असून त्यासाठी आपल्याला 3 लाख रुपये द्यावे लागतील, असं त्यानं सांगितलं. हे पैसे देण्याची तयारी अटल बिहारीनं दाखवली आणि वधूच्या कुटुंबीयांसोबत भेट निश्चित केली. या भेटीसाठी तरुणी सोना जायसवाल, दलाला गुलाब सिंह, त्याची पत्नी आणि मामा तिलक, मुलीची आई आणि बहीण असे सगळे घरी आले. लग्नाची प्राथमिक बोलणी झाल्यानंतर अटल बिहारीने दलाल गुलाब सिंहला 3 लाख रुपये दिले. काही दिवसांतच कोर्टात 500 रुपयांच्या स्टँप पेपरवर लग्नाची औपचारिकता पार पाडण्यात आली.
राखीच्या निमित्ताने झाली फरार
लग्नानंतर 15 दिवस अटल बिहारी आणि सोना यांचा संसार सुखाने सुरू होता. त्यानंतर एक दिवस मामा तिलक घरी आला आणि सोनाचा राखीसाठी घरी नेण्याची विनंती करू लागला. अटल बिहारी आणि त्याच्या कुटुंबीयांनी ही मागणी मान्य करत तिला माहेरी सोडलं. मात्र अनेक दिवस उलटले तरी सोना परत आली नाही. सोनाला फोन करण्याचा प्रयत्न केला असता, तो बंद झाला होता आणि सोना फरार झाल्याचं लक्षात आलं.
हे वाचा -
पुन्हा मागितले पैसे
आपल्यासोबत फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर अटल बिहारीनं दलाल गुलाब सिंहला फोन केला. त्यावर पुन्हा सोनाला घरी पाठवायचं असेल तर आणखी 3 लाख रुपये द्यावे लागतील, असं सांगितलं. त्यानंतर मात्र अटल बिहारीने पोलिसांत धाव घेतली आणि गुन्हा नोंदवला. पोलिसांनी दलाल गुलाब सिंहसह त्याचे सर्व नातेवाईक आणि सोनाच्या आईला अटक केली आहे. सोना मात्र सध्या फरार आहे. राजस्थानमध्ये लुटारू वधूंचं प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढत असून अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.