Home /News /crime /

बॅट, तवा, काठीने दररोज बेदम मारहाण करायची बायको; वैतागलेल्या प्रिन्सिपल नवऱ्याने अखेर...; CCTV मध्ये भयानक दृश्य कैद

बॅट, तवा, काठीने दररोज बेदम मारहाण करायची बायको; वैतागलेल्या प्रिन्सिपल नवऱ्याने अखेर...; CCTV मध्ये भयानक दृश्य कैद

एका मुख्याध्यापकाने आपल्या बायकोविरोधात ती आपला छळ करत असल्याचा आरोप केला आहे.

    राजेंद्र प्रसाद शर्मा/जयपूर, 25 मे : नवऱ्याने मारहाण केल्याच्या तक्रारी अनेक बायका करतात. पण आता एका नवऱ्याने आपली बायको मारहाण करत असल्याची तक्रार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. हा नवरा म्हणजे एका शाळेचा मुख्याध्यापक आहे. एका मुख्याध्यापकाला त्याची बायको घरी दररोज बेदम मारहाण करत होती. प्रिन्सिपल नवऱ्याचा बायको करत असलेली छळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडीओ आहे (Wife beat principal husband video viral). राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडीतील घरगुती हिंसाचाराचं (Domestic violence) हे विचित्र प्रकरण. सरकारी शाळेत मुख्याध्यापक असलेले अजित सिंह यादव यांनी आपली बायको सुमनविरोधात आपला छळ करत असल्याचा आरोप केला आहे. आपली बायको आपल्याला तवा, काठी, बॅट किंवा हातात जी काही वस्तू मिळेल त्याने बेदम मारहाण करत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. (wife accused of torture) . पत्नीपीडित मुख्याध्यापकाने पुरावे मिळावेत म्हणून आपल्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आणि आता आपल्या सुरक्षेसाठी भिवाडी कोर्टात धाव घेत, पुरावे म्हणून सीसीटीव्ही फुटेज सादर करत आपल्याला सुरक्षा आणि न्याय देण्याची मागणी केली आहे. अजित यांनी सांगितलं, सात वर्षांपूर्वी त्यांचं सुमनशी लव्ह मॅरेज झालं. काही कालावधीनंतर सुमनचं वागणं बदललं. आता तर ती दररोज टॉर्चर करते. कधी क्रिकेट खेळण्याच्या बॅटने, कधी जेवण बनवण्याच्या तव्याने मारते. घरातील कोणतीही वस्तू तिच्या हातात येते, त्याने ती मारत सुटते. बायको मारून मारून आपल्याला घरातून हाकलून लावते. एखाद्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल करते. हे वाचा - आधी पाल असलेली Cold drink दिली आणि नंतर...; McDonald’s मधील संतापजनक प्रकार; Video Viral अजित यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमाही आहेत. शिक्षक असल्याने त्यांनी तात्पुरते उपचार करून परिस्थिती सांभाळून घेतली. अजित म्हणाले, इतकं सर्व घडूनही सुमनवर कधीच हात उचलला नाही. कायदा हातात घेतला नाही. मी एक शिक्षक आहे आणि शिक्षकाने महिलेवर हात उचलणं म्हणजे आपला पेशा आणि भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहेत. कायदा हातात घेणं आहे. जर हे माझ्या विद्यार्थ्यांना समजलं असतं तर त्यांच्यावर काय परिणाम झाला असता. त्यांना एक मुलगाही आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता सुमन आपल्या पतीला मुलासमोरही मारताना दिसते आहे. तिचा मुलगाही खूप घाबरलेला दिसतो. हे वाचा - Shocking! अंत्यसंस्कारावेळी अचानक रडू लागलं 'मृत बाळ'; आईच्या गर्भातच झाला होता मृत्यू अजित सिंह मानसिकरित्याही आजारी पडले आहेत. काही क्षणातच ते सर्वकाही विसरतात. फक्त कामच नव्हे तर आपल्या सहकाऱ्यांची नावंही विसरतात. मारहाणीच्या भीतीने ते महिनाभर आपल्या घरी गेले नाहीत. इथं तिथं लपूनछपून दिवस काढत आहेत. अमेरिकेत असलेला बायकोचा भाऊच तिला हे सर्व करायला भाग पाडत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crime, Viral, Viral videos

    पुढील बातम्या