वैशाली, 04 ऑक्टोबर : नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या आड येतो म्हणून जावयाने आणि सासूच्या मदतीने सासऱ्याला बेदम मारहाण करून जीव ठार मारल्याची घटना समोर आली आहे. ही घटना लपवण्यासाठी सासऱ्याचा मृतदेह हा शेजाऱ्याच्या घरात लटकवण्यात आला होता. पण, अवघ्या काही तासांत या प्रकरणाचा छडा लागला. या प्रकरणी भावा
आजतक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील देसरी पोलीस स्टेशन अंतर्गत मुरौवतपूर भागात ही घटना घडली. सकाळी 50 वर्षीय तिलक राय याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिलक राय याचा मृतदेह हा त्याच्याच भावाच्या घराच्या छताला लटकवण्यात आला होता. मृतदेहावर जखमांची घाव होते.
रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि रक्ताने माखलेले दगड, दौंडमध्ये धक्कादायक घटना
स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आणि कुटुंबीयांची चौकशी केली. त्यावेळी मृत तिलक राय यांची पत्नी आणि अल्पवयीन मुलाने जबाब दिला. तिलक राय हे दारूच्या आहारी गेले होते. दररोज दारू पिऊन ते घरी येते होते. दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत होते. शनिवारी रात्री सुद्धा दारू पिऊन आल्यावर त्यांनी पत्नीला मारहाण केली आणि घरातून बाहेर निघून गेले.
पोलीस जबाब नोंदवून निघून गेले. पण, काही वेळानंतर या घटनेला नवीन वळण मिळाले. मृत तिलक राय यांचा भाऊ पोलीस स्टेशनला पोहोचला आणि त्याने तिलक यांच्या पत्नी, मुलगा आणि जावायाविरोधात एफआयआर दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून तिलक यांच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने वडिलांचा खून झाल्याची माहिती दिली.
धक्कादायक! बापाशी लग्न करण्यासाठी बॉयफ्रेंडची हत्या; बापलेकीने मिळून काढला काटा
मृत तिलक राय याची पत्नी सविता हिचे आपल्याच जावयासोबत अनैतिक संबंध होते. जावई मोहन राय हा समस्तीपूर भागात राहणार होता. लग्नानंतर तो सासरी मुरौवतपूरमध्ये येऊन राहत होता. काही दिवसांनी मोहन आणि सासू सविता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. याची माहिती मृत तिलक राय याला कळाली. त्यामुळे तो दोघांनाही विरोध करत होता. त्याने दोघांचीही समजूत काढली. पण दोघांनी त्याचे काही ऐकले नाही. त्यामुळे त्यांच्या नेहमी वाद होत होता. याच वादातून पुन्हा जावई मोहन आणि तिलक रायमध्ये शनिवारी भांडण झाले. त्यावेळी मोहन याने बेदम मारहाण करून सासरा तिलक राय याला ठार मारले. त्यानंतर त्याचा मृतदेह हा त्याच्याच भावाच्या घराच्या छताला लटकवला होता.
पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून घेतले. दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.