लहान मुलांनीच केला आई खूनी असल्याचा खुलासा, 'आधी पप्पांना खुर्चीवर बांधलं आणि...'

लहान मुलांनीच केला आई खूनी असल्याचा खुलासा, 'आधी पप्पांना खुर्चीवर बांधलं आणि...'

प्रेमात बुडलेल्या एका पत्नीने तिच्या प्रियकरासह पतीची हत्या केली आहे. तिच्या नवऱ्यालाा खुर्चीवर बांधून गळा आवळून खून केल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

आजमगड (उत्तर प्रदेश), 25 मे : लॉकडाऊनमध्ये हत्येचा एक खळखळजनक प्रकार समोर आला आहे. प्रेमात बुडलेल्या एका पत्नीने तिच्या प्रियकरासह पतीची हत्या केली आहे. तिच्या नवऱ्यालाा खुर्चीवर बांधून गळा आवळून खून केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांनीही या हत्येसंदर्भात धक्कादाकय उलगडा केला आहे.

प्रियकरासोबत पत्नीने पतीला संपवण्याचा कट रचला आणि त्याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पतीचं मृत शरीर एका पोत्यात भरून त्याला नाल्यात फेकून दिलं. पण ही सगळी घटना तिच्या दोन लहान मुलांनी पाहिली आणि त्यामुळेच हत्येचा कट उघडकीस आला. ही सनसनाटी घटना उत्तर प्रदेशमधील आजमगडची आहे.

कोरोनानंतर देशात आणखी एक संकट, या 5 राज्यांना दिला रेड अलर्ट

वडिलांच्या हत्येची संपूर्ण घटना पोलिसांना सांगितल्यावर हत्येचा थरार समोर आला. या घटनेत पत्नी आणि तिच्या प्रियकरानं निष्पाप वडिलांचा खून केला आणि मृत व्यक्तीला पोत्यात फेकून दिलं. एका आठवड्यानंतर, मृतदेह कुजल्यामुळे लोकांना वास येऊ लागला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ओळख पटल्यानंतर संपूर्ण घटनेत प्रेमसंबंधाचे प्रकरण समोर आलं.

बारामतीमध्ये धक्कादायक प्रकार, पायलटने विमानातच केला विद्यार्थिनीचा विनयभंग

पोलिसांनी आरोपी पत्नीची चौकशी केली पण तिने पोलिसांना काहीच सांगितलं नाही. अखेर तिच्या दोन मुलांकडून पोलिसांना सत्य समजलं. संपूर्ण घटना समजल्यानंतर पोलिसांना पत्नीकडून सत्य कबूल करून घेतलं. या घटनेत सामील झालेल्या पत्नीच्या प्रियकरालाही अटक करण्यात आली आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी तुमच्याकडेही आहे लस, तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

First published: May 25, 2020, 1:11 PM IST
Tags: murder

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading