हैदराबाद, 09 मार्च: एका व्यक्तीला दिलेली उधारी (Borrowed money) परत मागणं एका विधवा महिलेच्या जीवावर बेतलं आहे. दिलेली उधारी परत मागायला गेलेल्या महिलेला आरोपीने थेट आगीच्या हवाली (Widow Women set On fire) केलं आहे. धक्कादायक म्हणजे यावेळी तिच्या मदतीला कोणीही आलं नाही. त्यामुळे ती जवळच्याच एका झाडीत अर्धमेल्या अवस्थेत पडली होती. त्यानंतर गावकऱ्यांनी संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान संबंधित विधवा महिलेनं आपले प्राण सोडले आहेत. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना तेलंगणा राज्याच्या मेडक जिल्ह्यातील एका गावातील आहे. येथील 42 वर्षीय आदिवासी समुदायातील विधवा महिला सोमवारी उधारीचे पैसे मागण्यासाठी गेली होती. मात्र आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळलं आहे. या दुर्दैवी घटनेत पीडित महिला 80 टक्के भाजली आहे. यानंतर तिला हैदराबादमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिचा जीव वाचू शकला नाही. तिचा मृत्यू मंगळवारी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित 42 वर्षीय मृत महिलेचं नाव सकरी बाई आहे. ती सोमवारी उधारीचे पैसे परत घेण्यासाठी एका व्यक्तीकडे गेली होती. त्यावेळी आरोपीने पैसे परत न करता, तिच्यासोबत हे दुर्दैवी कृत्य केलं आहे. तिला आगीच्या हवाली केल्यानंतर संबंधित विधवा महिलेनं मदतीसाठी इकडे तिकडे धावली. मात्र तिला मदत करण्यासाठी कोणीही पुढं सरसावलं नाही. त्यानंतर ती जवळच्याच एका झाडीत अर्धमेल्या अवस्थेत पडली. कालांतराने तिला गावातील काही लोकांनी पाहिलं, आणि तिला जवळच्याच स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल केलं.
हे ही वाचा -Nagpur News:खुर्चीवर बसवले आणि हात पाय बांधून 65 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या
पण त्यानंतर तिची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला हैदराबाद येथे हालवण्याच्या सुचना दिला. पण सकरी बाई यांचा मंगळवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पेशाने कसाई असणाऱ्या पी सदत याला अटक केली आहे. उधारीच्या पैशावरून संबंधित महिलेचा आणि सदतसोबत वाद झाला होता. त्यानंतर सदतला संताप अनावर झाल्यानंतर त्याने संबंधित विधवा महिलेला पेटवून दिलं आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Hyderabad, Murder, Telangana