Home /News /crime /

माझ्याशी बोलत का नाही? रस्त्यावरच प्रियकराने प्रेयसीवर केले चाकूने सपासप वार

माझ्याशी बोलत का नाही? रस्त्यावरच प्रियकराने प्रेयसीवर केले चाकूने सपासप वार

आरोपी प्रशांत आणि मृणालीमध्ये प्रेमसंबंध होते. पण, काही दिवसांपूर्वी मृणालीने प्रशांतपासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ती प्रशांतसोबत बोलत नव्हती.

नागपूर, 08 डिसेंबर :  देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये  (Nagpur) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहण्यास मिळत आहे. शहरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरदिवसा एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवरून चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृणाली (वय 25) असं या तरुणीचे नाव आहे. जखमी तरुणीची प्रकृती सध्या चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहे. प्रशांत बरसागडे या तरुणाने तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. नववीत शिकणाऱ्या मुलीवर 13 दिवसांत 8 जणांकडून बलात्कार, 6 आरोपी अल्पवयीन! पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार सकाळी 10.30 च्या सुमारास  मृणाली ही आरोपी प्रशांत बरसागडे याला भेटायला आली होती. त्यावेळी दोघांमध्ये कुठल्या तरी कारणांवरून वाद झाला होता. दोघांची रस्त्यावर बाचाबाची झाली. काही कळायच्या आता रागाच्या भरात प्रशांतने आपल्यासोबत आणलेल्या चाकूने मृणालीवर चाकूने सपासप वार केले. चाकूचे वार वर्मी बसल्यामुळे मृणाली जागेवरच कोसळली. स्थानिकांनी धाव घेऊन मृणालीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत आणि मृणालीमध्ये प्रेमसंबंध होते. पण, काही दिवसांपूर्वी मृणालीने प्रशांतपासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ती प्रशांतसोबत बोलत नव्हती. अखेर आज सकाळी प्रशांतने तिला भेटायला बोलावले असता रागाच्या भरात चाकूने हल्ला केला. पुन्हा येणाऱ्यांचे दिवस संपले, काँग्रेस मंत्र्याचा फडणवीसांना टोला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जखमी मृणालीचा पोलिसांनी जाब घेतला आहे. आरोपी प्रशांत बरसागडेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या