Home /News /crime /

पतीच्या पुरुषत्वाला दिलं आव्हान, लग्नाच्या वाढदिवशीच अनैसर्गिक संबंधातून पत्नीचा मृत्यू

पतीच्या पुरुषत्वाला दिलं आव्हान, लग्नाच्या वाढदिवशीच अनैसर्गिक संबंधातून पत्नीचा मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

रात्री पती-पत्नी दोघेही एकत्र लग्नाचा वाढदिवस साजरा करीत होते. दोघेही एकत्र बसून दारूही प्यायले.

    भोपाळ, 14 मे : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) छिंदवाडामधील क्रूर पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. 10 मे रोजी दाम्पत्याच्या लग्नाचा वाढदिवस झाला. या दिवशी पती-पत्नी एकत्रितपणे दारू प्यायले. नशेत पत्नीने पतीच्या सेक्स करण्याच्या क्षमतेला आव्हान दिलं. यानंतर पती तिच्यासोबत अनैसर्गिक सेक्स करू लागला. ज्यात पत्नीचा जीव गेला. पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. ही घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील बिजोरी गुमाई येथील आहे. पतीने पोलिसांना सांगितलं की, पत्नीने आव्हान दिल्यानंतर तो तिच्यासोबत अनैसर्गिक सेक्स करू लागला. यामुळे पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमधून खूप रक्त वाहू लागलं आणि ती बेशुद्ध पडली. हे पाहून पती तेथून पळून गेला. थोड्या वेळात पत्नीचा मृत्यू झाला. 42 वर्षीय महिलेचा मृतदेह  तिच्याच घरी निर्वस्त्र अवस्थेत सापडला. पत्नीची अवस्था बिकट झाल्याचं पाहून पती तिचे कपडे दुसरीकडे फेकून पळून गेला. बाहेरील लोकांनी तिच्या कपड्यावर रक्ताचे दाग पाहिले, यानंतर महिलेने मुलाला याबाबत सांगितलं. मुलगा धावतच आपल्या आईकडे पोहोचला. मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता. मुलाने पोलिसांना याबाबत सूचना दिली. छिंदवाड़ातील पोलिसांनी सांगितलं की, महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर गंभीर जखमा झाल्या आहेत. रिपोर्ट आल्यानंतरच कारवाई करण्यात येईल. सध्या पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Madhya pradesh

    पुढील बातम्या