पत्नीची हत्या करून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्याला लोकांनी ठेचून मारलं, धक्कादायक VIDEO समोर

पत्नीची हत्या करून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्याला लोकांनी ठेचून मारलं, धक्कादायक VIDEO समोर

पत्नीची हत्या करून पळून जाताना तरुण झाला मॉब लिंचिंगचा शिकार, पाहा धक्कादायक VIDEO

  • Share this:

फतेहपूर, 02 नोव्हेंबर: पत्नीची हत्या करणाऱ्या तरुणाला जमावाकडून लाठ्या-काठ्यांनी जीवघेणी मारहाण केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर हा तरुण पळून जात होता त्याच वेळी स्थानिकांनी त्याला घेरुन बेदम मारहाण केली. उत्तर प्रदेशमधील फतेहपूर इथला अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशळ मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (31 ऑक्टोबर)रोजी तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली. नासिर कुरैशी असं या तरुणाचं नाव आहे. छत्तीसगडमधील बिलासपूर इथला हा रहिवासी असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी तो आपल्या पत्नीला म्हणजेच अफसरी उर्फ सोनीला घेऊन माहेरी आला होता. यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्याने रागात पत्नीवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर आईला वाचवण्यासाठी मुलगी आणि घरातील सदस्य धावून आले. यावेळी मुलगीही जखमी झाल्यामुळे तिच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांमध्ये खटके कशामुळे उडाले हे मात्र समजू शकलं नाही. पत्नीची हत्या केल्याचं लक्षात येताच तरुणाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिकांनी त्याला घेरलं आणि बेदम मारहाण केली. स्थानिकांनी केलेल्या मारहाणीत आरोपी नासिरचा जागीच मृत्यू झाला आहे.

आतापर्यंतच्या तपासात पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे दाम्पत्यांमध्ये सतत खटके उडत असल्याचंही सांगितलं गेलं होतं. रागाच्या भरात पत्नीला धडा शिकवण्यासाठी तरुणानं हे पाऊल उचललं का असा सवालही उपस्थित केला जात आहे.

सध्या गावात तणावाचं वातावरण आहे. सुरक्षेसाठी पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात आली असून तरुण आणि त्याच्या पत्नीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस पुढच्या तपासाची दिशा ठरवणार असल्याची माहिती दिली आहे. तरुणाला जीवघेणी मारहाण करणाऱ्या ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा व्हिडिओच्या मदतीनं तपास सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 2, 2019, 1:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading