Elec-widget

सेक्स टॉक...इंजिनिअरचा न्यूड Video तयार करून तरुणीने केलं ब्लॅकमेल

सेक्स टॉक...इंजिनिअरचा न्यूड Video तयार करून तरुणीने केलं ब्लॅकमेल

तिने त्याला आपल्या जाळ्यात फसवून ती रोज त्याच्याशी चावट गप्पा करायला लागली आणि त्यात तो फसला.

  • Share this:

बंगळूरू 11 नोव्हेंबर : सोशल मीडियाचा कोण कसा वापर करेल याचा काही नेम नाही. बंगळुरूमधल्या आयटी पार्कमधला एक तरूण सेक्स टॉकला बळी पडला आणि त्याला ते चांगलंच महागात पडलं. सेक्स टॉक करताना तो तरुणी समोर न्यूड झाला आणि तिने त्याचा व्हिडीओ तयार करून त्याला ब्लॅकमेल केलं. पैसे देऊनही तिचं ब्लॅकमेलिंग थांबत नसल्याने शेवटी तिने पोलिसांमध्ये तक्रार केली. पोलीस आता त्या तरुणीचा शोध घेताहेत. या आयटी इंजिनिअरची पत्नी डिलेव्हरीसाठी गावी गेली होती. त्यामुळे त्याने डेटिंग App वरून काही नंबर घेतले आणि संपर्क साधला. त्यातल्या एका तरुणीशी त्याने सेक्स टॉक करण्याची इच्छा व्यक्त केली. तिनेही त्याला होकार दिला आणि दोघांचं बोलणं सुरू झालं. तिने त्याला आपल्या जाळ्यात फसवून ती रोज त्याच्याशी चावट गप्पा करायला लागली असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

पूजा बेदी बॉयफ्रेंड मानेक सोबत घेतेय सुट्टीची मजा, रोमँन्टीक PHOTOS व्हायरल

नंतर तिने व्हिडीओ कॉल करायला सुरूवात करून त्यांचं त्यावर बोलणं सुरू झालं. तो जेव्हा आपल्या जाळ्यात आला हे तिला कळालं तेव्हा तिने त्याला न्यूड होण्यास सांगितलं. तो त्यासाठी तयार झाला. तिही तसेच करेल असं त्याला वाटत होतं. त्या तरूणीने असे तीन व्हिडीओ कॉल करून त्याचे न्यूड व्हिडीओ तयार केले आणि ती त्याला ब्लॅक मेल करायला लागली.

मलाइका ते सैफ पर्यंत, घटस्फोट झाल्यानंतर या स्टार्सच्या आयुष्यात आलं नवं प्रेम

मला पैसे पाठव नाहीतर हे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून देतो असं सांगत तिने त्याला ब्लॅकमेल केलं. त्याने काही वेळा पैसे पाठवले मात्र तिचा तगादा सुरूच असल्याने शेवटी त्याने पोलिसांमध्ये तक्रार दिली. आता पोलीस त्या तरुणीचा शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2019 11:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...