Elec-widget

बहिणींनी आईची हत्या करून मृतदेह फेकला तलावात, गावकऱ्यांनी दिला चोप

बहिणींनी आईची हत्या करून मृतदेह फेकला तलावात, गावकऱ्यांनी दिला चोप

दोन सख्ख्या बहिणींनी मिळून आपल्या आईचीच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

कोलकाता, 12 ऑक्टोबर : दोन सख्ख्या बहिणींनी मिळून आपल्या आईचीच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलींनी आईची हत्या करून तिचा मृतदेह तलावात फेकल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलींचे वय केवळ 18 वर्ष आणि 19 वर्ष एवढे आहे. हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव कृष्णा देवी (53 वर्ष) असे आहे. ही महिला शिक्षिका होती, अशी माहिती देखील समोर आली आहे. ही हादरवणारी घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे.

(वाचा : SPECIAL REPORT : रक्षक नव्हे भक्षक, पोलिसाने रशियन मॉडेलवर केला 12 वर्ष बलात्कार; भाऊ-बहिणीलाही संपवलं?)

आरोपी मुलींना गावकऱ्यांनी दिला चोप

कृष्णा देवी यांचा मृतदेह सापडल्यानंतर दोन्ही मुलींना गावकऱ्यांनी मिळून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं.

(वाचा : मित्रांनी ग्रुप सेक्ससाठी केलं ब्लॅकमेल, 12वीच्या विद्यार्थिनीनं स्वतःला घेतलं पेटवून)

Loading...

आपल्या मुलींकडून प्रचंड मारहाण होत असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी कृष्णा देवी यांनी स्थानिक नगरसेवकाकडे केली होती. यानंतर 7 ऑक्टोबर रोजी कृष्णा देवी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. यानंतर शनिवारी (12 ऑक्टोबर) थेट त्यांचा मृतदेहच सापडला. याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा देवी यांच्या दोन्ही मुलींना ताब्यात घेतलं आहे. केवळ पैशांसाठी दोन्ही मुली आपल्या आईला मारहाण करत असे, अशी माहिती समोर आली आहे.

वाचा :पत्नीच्या रोजच्या कटकटीला कंटाळला होता पती, पत्नीला संपवूून केली आत्महत्या

SPECIAL REPORT: ठाण्यातील 'हा' रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 08:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...