मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कॅमेऱ्याचा अ‍ॅंगल आवडला नाही म्हणून भर मांडवात व्हिडीओग्राफरची गोळया झाडून हत्या

कॅमेऱ्याचा अ‍ॅंगल आवडला नाही म्हणून भर मांडवात व्हिडीओग्राफरची गोळया झाडून हत्या

लग्न सुरू असताना व्हिडिओचा अँगल चुकल्यामुळे नशेत धूत असलेल्या तरुणाने गोळीबार केला. यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले तर अति रक्तस्राव झाल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar
फिरोझाबाद, 29 फेब्रुवारी : लग्न म्हटलं की व्हिडिओ आणि फोटोंची धूम असते. सध्या लग्न समारंभात व्हिडिओ आणि फोटोग्राफर्सला खूप डिमांड आहे. अशात एक असा प्रकार समोर आला ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. लग्नामध्ये व्हिडिओचा अँगल नीट न काढल्यामुळे एका तरुणाने थेट गोळीबार करून व्हिडिओग्राफरची हत्या केली आहे. भर लग्नात झालेल्या या प्रकारामुळे संपूर्ण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील फिरोझाबादमध्ये एका लग्न सोहळयामध्ये गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली आहे. लग्न सुरू असताना व्हिडिओचा अँगल चुकल्यामुळे नशेत तर्रर्र असलेल्या तरुणाने गोळीबार केला. यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले तर अति रक्तस्राव झाल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रोहित कुमार (20)असं मृत व्हिडिओग्राफरचं नाव आहे तर सत्येंद्र यादव असं गोळ्या घालणाऱ्या आरोपीचं नाव आहे. इतर बातम्या - आजीला कसला आला इतका राग की 5 महिन्याच्या नातीला जमिनीवर आपटलं, जागीच मृत्यू लग्नाच्या कार्यक्रमामध्ये सत्येंद्र दारूच्या नशेत होता. त्यावेळी त्याने पाहिलं की व्हिडिओग्राफर व्हिडिओचा अँगल चुकीचा घेत आहे. त्याने पाहताच खिशातल्या डबल बॅरल शॉटगनमधून व्हिडीओग्राफी करणाऱ्या टीमवर दोन गोळया झाडल्या. यात दोन जण जखमी झाले तर मोठया प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे रोहितचा मृत्यू झाला. जखमींवर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. इतर बातम्या - दिल्लीनंतर CAA विरोधात आणखी एक राज्य पेटलं; एकाचा मृत्यू, 6 शहरांमध्ये कर्फ्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर सत्येंद्र यादव आणि कुलदीप दोघेही घटनास्थळावरुन फरार झाले. या प्रकरणात पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून मृत रोहितचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर आपल्या तरुण मुलाला अशा प्रकारे गमावल्यामुळे कुमार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इतर बातम्या - पाच जणांच्या टोळीने तरुणाच्या डोक्यात वार करून केला खून, चेहरा दगडाने ठेचला
First published:

Tags: Crime news, Uttar pradesh news

पुढील बातम्या