Home /News /crime /

बापरे! उत्पन्नापेक्षा 1450 पट अधिक संपत्ती; इंजिनिअर, इन्स्पेक्टरने केलेला भ्रष्टाचार पाहून ACB हैराण

बापरे! उत्पन्नापेक्षा 1450 पट अधिक संपत्ती; इंजिनिअर, इन्स्पेक्टरने केलेला भ्रष्टाचार पाहून ACB हैराण

चार घरं, फार्म हाऊस याशिवाय 3 लाख 87 हजार रोख, 30 लाखांचं सोनं, 245 यूरो, दोन हजार डॉलर आणि मर्सिडीजसह 5 महागड्या गाड्या...

    राजस्थान, 2 जुलै: राजस्थानमध्ये (Rajasthan) गेल्या अनेक दिवसांपासून ACB अॅक्शनमध्ये (Anti-Corruption Bureau) आली आहे. येथील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार (Fraud) पाहून अधिकारीही हैराण झाले. उत्पन्नाच्या 1400 हून अधिक पट संपत्ती यातील एका अधिकाऱ्याने जमा केली आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टीने विचार करीता ही परिस्थिती भयावह आहे. राजस्थानमधील जयपुर, जोधपुर आणि चित्तोडगडमधील तीन अधिकाऱ्यांच्या 14 ठिकाण्यांवर एकत्रितपणे कारवाई केली जात आहे. जयपूरमधील जयपूर विकास प्राधिकरणाचे (JDA) इंजिनिअर निर्मल गोयल याच्या घरातून त्याच्या उत्पन्नापेक्षा 1450 पट अधिक संपत्ती सापडली आहे. सांगितलं जात आहे की, JDA च्या इंजिनिअरचा पगार दीड लाख आहे, मात्र जयपूरच्या पॉश कॉलनीत त्याची चार घरं, फार्म हाऊस याशिवाय 3 लाख 87 हजार रोख, 30 लाखांचं सोनं, 245 यूरो, दोन हजार डॉलर आणि मर्सिडीजसह 5 महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय बँकांमध्येही या इंजिनिअरची अनेक लॉकर असून त्याचा तपास अद्याप शिल्लक आहे. हे ही वाचा-लग्नाआधी सेक्स करण्याची धक्कादायक शिक्षा; तरुणीचा मृत्यू, प्रियकर गंभीर जिल्हा परिवहन अधिकाऱ्याच्या घरी छापा अशा प्रकारे चित्तोडगडच्या जिल्हा परिवहन अधिकारी मनीष शर्मा यांच्याजवळ दोन कोटींच्या गुंतवणुकीची कागदपत्रं मिळाली आहेत. फ्लॅटमध्ये एक लाख रुपये रोख, परदेशी यात्रेची कागदपत्रं ACB ने जप्त केली आहेत. याशिवाय महागड्या गाड्या आणि बाइकदेखील ताब्यात घेण्यात आली आहेत. इन्स्पेक्टरची संपत्ती उत्पन्नापेक्षा 333 टक्क्यांनी अधिक दुसरीकडे जोधपूरमध्ये इन्स्पेक्टर प्रदीप शर्मा याच्या घरात ACB ने छापेमारी केली. यावेळी इन्स्पेक्टरची जोधपूर, भोपाळ आणि बिकानेरमध्ये 4 ठिकाणी तब्बल साडे चार कोटींची गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे. ही संपत्ती त्याच्या उत्पन्नाच्या 333 पटीने अधिक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ACB अॅक्शनमध्ये राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून ACB अॅक्शनमध्ये आली आहे. गेल्या आठवड्यात ACB ने जयपूरमधील लेबर कमिश्नर प्रतीक जागडिया याला तीन लाख रुपयांची लाच घेताना अटक केली होती. या कारवाईत आणखी दोघांना ACB ने ताब्यात घेतलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Money fraud, Rajasthan

    पुढील बातम्या