Home /News /crime /

मुली आजीच्या गावी गेल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार, जन्मदात्या बापानेच केला होता बलात्कार

मुली आजीच्या गावी गेल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार, जन्मदात्या बापानेच केला होता बलात्कार

आर्वी पोलिसांनी आरोपी पित्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

    नरेंद्र मते, वर्धा, 22 सप्टेंबर : वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जन्मदात्या पित्यानेच पोटाच्या दोन मुलींवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. यात एका मुलीला गर्भधारणा झाल्याने नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघड झाला. दोन्ही मुली नागपुरात आजीकडे गेल्या असताना ही घटना उजेडात आली. आर्वी पोलिसांनी आरोपी पित्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. सध्या आर्वी शहरात वास्तव्यास असणारा आरोपी इसम मूळचा नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. कुटुंबाला घेऊन काही वर्षांपासून तो सासुरवाडीत आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहायला आला. येथे पत्नीसह 13 वर्षीय आणि 14 वर्षीय दोन मुलींसह वासतव्यात होता. याच दरम्यान गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बापाने पोटाच्या दोन्ही मुलीवर अत्याचार केला आणि कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्यांना दिली. काही दिवसांपूर्वीच दोन्ही मुली नागपूरला आजीकडे सुट्टीसाठी गेल्या. यावेळी एकीची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात नेल्यानंतर ती गर्भवती असल्याचे कळाले आणि त्यानंतर पित्याने केलेलं कृत्य उघड झालं. यात दोघींनी त्यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी प्रसंगाची माहिती दिली. लागलीच या प्रकरणाची तक्रार नागपूर पोलिसात करण्यात आली. घटनास्थळ आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपासात आर्वी पोलिसांनी नराधम पित्याला अटक करत गजाआड केले. यात मुलींची वैदकीय तपासणी करत अधिक तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास प्रभारी ठाणेदार गोपाल ढोले यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम कोरडे करत आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Wardha, Wardha news

    पुढील बातम्या