Home /News /crime /

ICU मध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या महिलेवर वॉर्ड बॉयने केला बलात्कार

ICU मध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या महिलेवर वॉर्ड बॉयने केला बलात्कार

एका वॉर्ड बॉयने (Ward Boy) रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेवर रात्रभर बलात्कार (Raped On ICU patient) केल्याची घटना समोर आली आहे.

    जयपूर, 18 मार्च: 1973 साली मुंबईतील एका रुग्णालयात अरुणा शानबाग नावाच्या एका नर्सवर रुग्णालयातील एका वॉर्ड बॉयने बलात्कार केला होता. या घटनेमुळं संपूर्ण देश पेटून उठला होता. या बलात्कार प्रकरणाच्या आठवणी अद्याप देशाच्या स्मृतीतून पुसल्या गेल्या नाहीत. अशातच एका वॉर्ड बॉयने (Ward Boy) रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेवर  रात्रभर बलात्कार (Raped On ICU patient) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणामुळे पुन्हा एकदा अरुणा शानबाग प्रकरणाची आठवण करून दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वॉर्ड बॉयने आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या एका महिलेवर रुग्णालयात बलात्कार केला आहे. यावेळी पीडित महिला व्हेंटिलेटरवर होती, तसेच तिच्या तोंडाला मास्क लावण्यात आला होता. त्यामुळे ती ओरडूही शकली नाही. या संधीचा फायदा घेवून आरोपीने बेशुद्धावस्थेत असणाऱ्या या महिलेवर रात्रभर हा घृणास्पद प्रकार केला आहे. सबंधित घटना सोमवारी रात्री घडली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी खुशीराम गुर्जर याला अटक केली आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेवून पोलीस पुढील तपास करत आहेत. सदर घटना ही राजस्थानातील जयपूर याठिकाणी घडली आहे. जयपूरमधील शैल्बी हॉस्पिटलच्या व्हेंटिलेटरवर असणाऱ्या एका महिलेवर वॉर्ड बॉयने रात्रभर अश्लील चाळे केले आहेत. तिच्यावर व्हेटिलेटर उपचार सुरू होते. तसेच ऑपरेशन झाल्यामुळे पीडितेच्या तोंडाला मास्क लावण्यात आला होता. या संधीचा फायदा घेवून वॉर्ड बॉय खुशीराम गुर्जर याने पीडित महिलेसोबत अश्लील चाळे केले आहेत. त्यामुळे पीडित महिला रात्रभर रडली आहे. हे ही वाचा -'वयाच्या 15 व्या वर्षी झाला होता बलात्कार’; प्रियांकाच्या मैत्रिणीचा मोठा खुलासा लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळ झाल्यानंतर पीडित महिलेचा पती रुग्णालयात आला. यावेळी महिलेनं तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिला व्यवस्थित सांगता येतं नव्हतं. त्यामुळे पीडितेच्या पतीनं पेन आणि कागद दिला, तेव्हा पीडित महिलेनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार लिहून सांगितला. या धक्कादायक प्रकारानंतर महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी नाडौटी करौली येथील रहिवासी असलेल्या खुशीराम गुर्जरला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस इतर पुरुष नर्सिंग कर्मचाऱ्यांचीही चौकशी करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Jaipur, Rajasthan, Rape

    पुढील बातम्या