• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • गावातील पुरुषासोबत पळून गेली अल्पवयीन मुलगी, गावकऱ्यांनी मुंडण करत काढली धिंड

गावातील पुरुषासोबत पळून गेली अल्पवयीन मुलगी, गावकऱ्यांनी मुंडण करत काढली धिंड

गावातील अल्पवयीन मुलगी गावातीलच एका (villagers shaved head of girl eloped with a man) पुरुषासोबत पळून गेल्याच्या रागातून समाजातील लोकांनी तिचं मुंडण करत धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

 • Share this:
  अहमदाबाद, 13 नोव्हेंबर: गावातील अल्पवयीन मुलगी गावातीलच एका (villagers shaved head of girl eloped with a man) पुरुषासोबत पळून गेल्याच्या रागातून समाजातील लोकांनी तिचं मुंडण करत धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. समाजाची परवानगी न घेता (Community gave punishment) परपुरुषासोबत पळून गेल्याचा आरोप ठेवत तिला धडा शिकवण्यात आल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे. आधुनिक काळातही अशा अघोरी प्रद्धतीनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. काय आहे प्रकरण? गुजरातच्या पाटण जिल्ह्यात राहणाऱ्या एका 14 वर्षांच्या मुलीचं गावातीलच एका पुरुषावर प्रेम होतं. हरजी नावाच्या गावात राहणारी ही मुलगी त्या पुरुषासोबत पळून गेली होती. त्यानंतर काही दिवसांनी या दोघांना शोधून पुन्हा गावात आणण्यात आलं. समाजाची परंपरा लाथाडत तरुणीने परपुरुषासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तिला दोषी ठरवण्यात आलं आणि तिची गावातून धिंड काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मुलीचं केलं मुंडण या मुलीचं गावकऱ्यांनी मुंडण केलं. मुलीचं मत विचारात न घेता जबरदस्तीनं काही महिलांनी तिला पकडून ठेवलं आणि तिचे केस कापण्यात आले. यावेळी मुलगी आरडाओरडा करून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिच्या विरोधाला न जुमानता गावकऱ्यांनी तिचे केस कापले आणि तिच्या चेहऱ्याला काळा रंग फासला. मुलगी ज्या पुरुषासोबत पळून गेली होती त्यालादेखील सोबत घेण्यात आलं. दोघांचीही गावातून धिंड काढण्यात आली. पोलिसांची कारवाई सुरू पोलिसांनी या प्रकरणी 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता आणखीनच धक्कादायक बाबी उजेडात आल्या आहेत. ज्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीला पळवून नेलं होतं, त्याने मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं उघड झालं आहे. कायद्यानुसार अल्पवयीन मुलीसोबत तिच्या संमतीने किंवा संमतीविना प्रस्थापित केलेले शारीरिक संबंध हा बलात्कार मानला जातो. या कायद्यानुसार आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  Published by:desk news
  First published: