मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये उलटला दारुचा ट्रक, पोलीस येण्याअगोदर नागरिकांनी पळवल्या बाटल्या

दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये उलटला दारुचा ट्रक, पोलीस येण्याअगोदर नागरिकांनी पळवल्या बाटल्या

दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये एक ट्रक उलटला आणि त्यातून चक्क दारुच्या बाटल्या बाहेर पडल्या. मग काय? पोलीस येण्यापूर्वी ग्रामस्थांनीच ट्रककडे धाव घेतली.

  • Published by:  desk news

पटना, 29 डिसेंबर: वेगवेगळ्या ब्रंँडची दारु (Illegal liquor) घेऊन जाणारा ट्रक उलटल्यानंतर (Truck Accident) परिसरातील ग्रामस्थांनी (Villagers) ट्रकमधील बाटल्या (Bottle) पळवून नेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. बिहारमध्ये सध्या (Bihar Liqour Ban) दारुबंदी असून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या ज्या ठिकाणी दारु असल्याचा संशय येईल, त्या ठिकाणी पोलीस छापे घालून दारु जप्त करत असल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत बिहारमध्ये चक्क दारुचा ट्रक उलटल्यामुळे नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

असा झाला अपघात

बिहारमधील जमुईमध्ये अवैध दारु भरलेला ट्रक 20 फूट खोल दरीत कोसळला. या अपघातानंतर घाबरलेला ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लिनर हे घाबरून ट्रक जागीच उभा करून पळून गेले. एक ज्येष्ठ नागरिक या घटनेत जखमी झाले. ट्रकच्या अपघाताची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि ट्रक दारुचा असल्याचं समजल्यावर गावकऱ्यांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली.

पोलीस येण्याअगोदर लूट

या ट्रकमध्ये तीन वेगवेगळ्या ब्रँडची अवैध दारू भरलेल्या बाटल्या होत्या. पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच गावकरी तिथं गेले आणि प्रत्येकाने शक्य तेवढ्या बाटल्या उचलून तिथून पोबारा केला. पोलीस येईपर्यंत ट्रकमधील बराचसा माल ग्रामस्थांनी लंपास केला होता.

हे वाचा- शास्त्रज्ञांनी शोधला वादळाचा नवीन प्रकार; काही वेळात पाडू शकतो धो-धो पाऊस

पोलीस करतायत तपास

पोलिसांनी उरलेला दारुसाठी जप्त केला असून त्याची मोजणी सुरू केली आहे. ट्रक नंबरवरून ट्रकच्या मालकाचा शोध सुरू करण्यात आला असून त्याने नेमकी किती दारु ट्रकमधून आणली होती, याचा तपास पोलीस करत आहेत. बिहारमध्ये दारुच्या विक्री, वितरण आणि प्राशन यावर बंदी असताना ही दारू आलीच कशी आणि कोण याची तस्करी करत होतं, याचाही पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दारुबंदीची घोषणा करूनही अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासनाला अनेक अडथळे येत असून वेगवेगळ्या मार्गांनी तस्करीचे प्रयत्न सुरूच असल्याचं चित्र आहे.

First published:

Tags: Accident, Bihar, Liquor stock, Police