विवाहितेचे अनैतिक संबंध उघड, ग्रामस्थांनी कापलं दोघांचं नाक; वाचा नेमकं काय घडलं

विवाहितेचे अनैतिक संबंध उघड, ग्रामस्थांनी कापलं दोघांचं नाक; वाचा नेमकं काय घडलं

विवाहित महिलेला बॉयफ्रेंडला घरात लपवणं आणि त्यासोबत अनैतिक संबंध ठेवणं चांगलंच महागात पडलं आहे.

  • Share this:

अयोध्या, 29 जानेवारी : आपल्या बॉयफ्रेंडला घरात लपवून ठेऊन त्यासोबत अनैतिक संबंध ठेवणं विवाहित महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अयोध्येमधील (Ayodhya) धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंब आणि स्थानिक ग्रामस्थांनी मिळून विवाहित महिलेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला चांगलाच चोप देत दोघांचं नाक कापलं आहे.

पटरंगामधील खंड पिपरा गावात 30 वर्षीय विवाहित महिलेला आणि तिच्या 23 वर्षीय बॉयफ्रेंडला अनैतिक संबंध प्रकरणी ग्रामस्थांनी मारहाण केली आहे. हे दोघेही लपून-छपून भेटत होते. अनेकदा ही महिला आपल्या घरातच बॉयफ्रेंडला लपवून ठेवत असे. ही गोष्ट कुटुंबीयांना समजताच त्यांनी दोघांना धडा शिकवण्याचा निर्धार केला. कुटुंबीयांनी दोघांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली.

विवाहित महिलेला घरी पकडलं. एके दिवशी घरी कोणीही नसताना बॉयफ्रेंड घरी आला. याची माहिती मिळताच कुटुंबीयांना घराला घेराव घातला. परंतु, महिलेने त्याला घरात लपवलं आणि त्यांचे संबंध लपवण्यात ती यशस्वी ठरली. यावेळी दोघं बचावले होते.

अखेर अनैतिक संबंध उघड

रात्री उशीरा बॉयफ्रेंड महिलेच्या घरातून निघाल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला पकडले. यावेळी ग्रामस्थांनी त्याला चांगाला चोप दिला. महिलेने मारहाणीला विरोध केल्यानंतर तिलाही मारहाण करण्यात आली. यानंतर तिला दोरीच्या साहाय्याने बांधून पुन्हा मारहाण केली. नंतर संतप्त कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी दोघांना शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी दोघांचं नाक कापण्यात आलं. गेल्या पाच-सहा वर्षांपासून दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

दोघेही पोलिसांच्या ताब्यात

मारहाणीनंतर दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पटरंगा पोलिसांनी दोघांना उपचाराकरिता आता रुग्णालयात दाखल केलं आहे. दोघांनी कोर्टात जाऊन लग्न करण्याचं ठरवलं होतं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

अन्य बातम्या

व्यापाऱ्याने आंदोलकांवर भिरकावली मिरची पावडर, पोलिसांनी केला लाठीचार्ज VIDEO

एक चूक झाली आणि अख्खं कुटुंब गमावलं, डोळ्यासमोरच मुलगा, मुलगी आणि पत्नी ठार

सरांच्या प्रश्नांना उत्तरं देतो म्हणत वर्गमित्रांची हुशार विद्यार्थ्याला मारहाण

First published: January 29, 2020, 7:11 PM IST

ताज्या बातम्या